Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ना धाक ना भीती… संगमनेरात एसटी बसमध्ये चढताना दोन महिलांचे १५० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले; दागिने चोरीच्या दोन तासात दोन घटना
गुन्हेगारी

ना धाक ना भीती… संगमनेरात एसटी बसमध्ये चढताना दोन महिलांचे १५० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले; दागिने चोरीच्या दोन तासात दोन घटना

दागिने चोरांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार १७ डिसेंबर | अनंत पांगारकर

संगमनेर – संगमनेर शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. दोन तासाच्या अंतरात संगमनेर बस स्थानकावर दोन प्रवासी महिलांच्या जवळील दीडशे ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी संध्याकाळी समोर आला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात लता शरद घुगे (रा. सायखेडा, निफाड) व शुभांगी रवींद्र कासार (रा. खराडी, पुणे) या दोन्ही महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दागिने चोरीचे स्वतंत्र दोन गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार नोंदविण्यात आले आहेत.

संगमनेर शहरातील दागिने चोरीच्या घटना लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला या संदर्भात समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका टोळीचा माग काढत आरोपींना पकडले होते. या आरोपींकडून संगमनेर शहरातील तब्बल आठ आणि लोणी येथील एका गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले होते. गुन्हे शाखेने हे आरोपी संगमनेर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पुढे काय घडले या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

दरम्यान शहरातील दागिने चोरीची ही मालिका अद्यापही कायम असल्याचे समोर आले असून सोमवारी दुपारी दोन वाजता सायखेडा (निफाड) येथील महिला संगमनेर बस स्थानकावर नासिककडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना या महिलेच्या पर्समध्ये असलेले ७८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन हजार रुपये किमतीच्या चांदीच्या बांगड्या आणि दोन हजार रुपयांची रोकड अज्ञात चोराने लंपास केली.

यामध्ये ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ३६ ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे तीन ओम पान, एक ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग, दोन ग्रॅम वजनाची नथ आणि तीन ग्रॅम वजनाचे मनी याचा समावेश आहे. या संदर्भात लता शरद घुगे (रा. सायखेडा, निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना घडून दोन तासांचा अवधी होत नाही तोच दुपारी पुन्हा सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना खराडी (पुणे) येथील महिलेच्या पर्स मधून ८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याची घटना समोर आली.

पर्स मधून चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण पोत, पाच ग्रॅमचे सोन्याचे पेंडल आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे नथ याच्यासह तीन हजार रुपयांच्या रोकड रकमेचा समावेश आहे.

चोरीच्या दोन्ही घटनांचा तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे पोलीस नाईक कार्तिकी जाधव आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश हासे करत आहे.दोन तासाच्या अंतरात एकाच ठिकाणी घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांचा धाक चोरट्यांवर उरला नसल्याचे समोर आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,145
दागिने चोरी संगमनेर बस स्थानक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या…

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.