Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी उपनगराध्यक्षाच्या मुलावर कोयत्याने हल्ला, हवेत गोळीबार करत हल्लेखोर संगमनेरच्या दिशेने…
गुन्हेगारी

माजी उपनगराध्यक्षाच्या मुलावर कोयत्याने हल्ला, हवेत गोळीबार करत हल्लेखोर संगमनेरच्या दिशेने…

हल्लेखोरांच्या कार मध्ये सापडला गावठी कट्टा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/12/2024Updated:18/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार १८ डिसेंबर 

सिन्नरचे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे यांच्या मुलावर हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. हल्लेखोरांनी सागर लोंढे यांच्या पाठीवर, डाव्या हातावर, डोक्यावर कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.

दुकानात शिरून हल्ला – सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील रस्त्यावर वावी वेस जवळील दोस्ती ट्रेडर्स या स्टीलच्या दुकानात आय ट्वेंटी या चार चाकी कारमधून आलेल्या चौघांपैकी तिघांनी दुकानाचे संचालक सागर नामदेव लोंढे (वय २८) यांच्यावर दुकानात शिरून हा हल्ला केला. सागर यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाल्याने आसपासच्या नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले.

या ठिकाणी झाला हल्ला

हल्लेखोर संगमनेरच्या दिशेने – हल्ल्यादरम्यान चार चाकी वाहनात थांबून असलेल्या एकाने हवेत गोळीबार केल्याने आजूबाजूचे लोक तात्काळ आवाजाच्या दिशेने दुकानाकडे पळत आले. दरम्यान हल्लेखोर कारमधून वेगाने संगमनेरच्या दिशेने निघून गेले.

पोलीस घटनास्थळी – दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. दुकानाच्या बाहेर व दुकानाच्या आत असलेला रक्ताचा सडा पाहून पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वानपथक व ठसे तज्ञ घटनास्थळी पोहोचले आहे.

कार दुभाजकावर आदळली – सिन्नर पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी नांदूर शिंगोटे पोलिसांशी संपर्क साधला असता नांदूर शिंगोटे पोलिसांनी सिन्नर संगमनेर मार्गावर नाकाबंदी केली. हल्लेखोरांचे वाहन नांदूर शिंगोटे जवळ असलेल्या नाकाबंदीपाशी आले असता पोलिसांची नाकाबंदी बघतात हल्लेखोरांनी आपल्या ताब्यातील कार पुन्हा नाशिकच्या दिशेने वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोर यांचे वाहन दुभाजकावर जाऊन आदळून त्यातच अडकून पडले. त्यामुळे हल्लेखोरांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एकाची मोटार सायकल घेत तिघे तिच्यावरून निमोणच्या रस्त्याने पसार झाले. यादरम्यान उर्वरित एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.

कार तपासणीत आढळला गावठी कट्टा – दरम्यान नांदुर-शिंगोटे येथे दुभाजकावर अडकून पडलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून तिची तपासणी केले असता त्यात पोलिसांना गावठी कट्टा आढळून आला आहे. तसेच हल्लेखोरांकडील कार चोरीची आहे की मालकीची याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,943
माजी उपनगराध्यक्ष सिन्नर हल्ला
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.