Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकार महर्षी थोरात कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील ऊसाला प्रति टन तीन हजार रुपयांचा ॲडव्हान्स भाव
शेती व सहकार

सहकार महर्षी थोरात कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील ऊसाला प्रति टन तीन हजार रुपयांचा ॲडव्हान्स भाव

कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाला २८०० रुपये
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 21, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार २१ डिसेंबर 

संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून २०२४-२५ या वर्षाच्या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ऊसाला प्रति टन २८०० रुपये व २०० रुपये उसविकास अनुदान याप्रमाणे प्रति टनामागे तीन हजार रुपयांचा भाव देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर वाटचाल करणाऱ्या व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचे हीत सातत्याने जोपासले आहे. सातत्याने सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर मोठा विश्वास दर्शविला आहे. काटकसर, पारदर्शकता आणि आधुनिकीकरण या तत्त्वांचा वापर केल्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून निळवंडे धरणाचे जनक बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून डावा व उजवा कालवा ही पूर्ण झाला आहे. वितरिकांच्या कामासाठीही थोरात हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पाण्याच्या मुबलकतेमुळे आगामी वर्षांमध्ये कार्यक्षेत्रात ऊस लागवड वाढणार आहे.

कार्यक्षेत्राबाहेरील ऊसाला २८०० रुपये भाव – थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या गळीत हंगामासाठी येणाऱ्या ऊसास २०० रुपयाप्रमाणे ऊस विकास अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊसास प्रति टन २८०० रुपये आणि ऊस विकास अनुदान २०० रुपये असा तीन हजार रुपये प्रति टन ॲडव्हान्स भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर कार्यक्षेत्राबाहेरी ऊसास मात्र २८०० रुपये प्रति टन भाव मिळणार आहे.

१० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस गाळपाचे नियोजन…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने कायम शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांचे हित जोपासले असून तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. यावर्षीही १० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. – जगन्नाथ घुगरकर, कार्यकारी संचालक, सहकार महर्षी थोरात कारखाना.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 910
ऊस भाव सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

July 18, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

July 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

आजचे राशीभविष्य ​मेष – आजच्या दिवशी आर्थिक नियोजनावर भर देणे आवश्यक ठरेल. अनपेक्षित खर्चात वाढ…

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026

आज, शुक्रवार २४ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.