Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

July 30, 2026

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महसूलच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणारी पिकअप पकडली, अमोल जोंधळेवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

महसूलच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणारी पिकअप पकडली, अमोल जोंधळेवर गुन्हा दाखल

ग्राम महसूल अधिकारी संतोष जाधव, मच्छिंद्र तात्याबा राहणे आदींनी तहसीलदारांच्या आदेशावरून शहर व परिसरात विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांचा शोध सुरू केला असता...
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 25, 2024Updated:December 25, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २५ डिसेंबर 

संगमनेर – संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या आदेशावरून महसूलच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाळू वाहतूक करणारी विना क्रमांकाची पिकअप वाळूसह पकडली असून विनापरवाना बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या अमोल संजय जोंधळे (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना शहरातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. मांजरे यांनी तात्काळ आपल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना गेल्या बुधवारी शहर व आसपासच्या परिसरात शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

ग्राम महसूल अधिकारी संतोष जाधव, मच्छिंद्र तात्याबा राहणे आदींनी तहसीलदारांच्या आदेशावरून शहर व परिसरात विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्यांचा शोध सुरू केला असता त्यांना कासारा दुमाला गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गाच्या पूर्व बाजूस असलेल्या सर्विस रोडला एका विना क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप मधून वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पथकाने पिकअप चालकाला थांबवून त्याच्याकडे वाळू वाहतुकीबाबत शासकीय परवाना असल्या संदर्भात विचारपूस केली असता त्याच्याकडे परवाना आढळून आला नाही तसेच पिकअप मालक तोच असल्याचे अमोल जोंधळे यांनी सांगितले.

पथकाने वाळूने भरलेली पिकअप ताब्यात घेत तिची पाहणी केली असता त्यात पाच हजार रुपये किमतीचे अर्धा ब्रास वाळू आढळून आली. पथकाने पंचनामा करत पिकअपसह दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत तहसील कचेरीत आणला.

या संदर्भात मच्छिंद्र तात्याबा रहाणे (वय ४८ वर्षे धंदा – नोकरी रा. चंदनापुरी ता संगमनेर जि अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्थीक फायद्याकरीता नदी पात्रातुन विनापरवाना बेकायदा वाळुची चोरी करून वाहतुक करताना मिळून आलेल्या विना क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या पिकअप चालक-मालक अमोल संजय जोंधळे (रा. गोल्डन सिटी, संगमनेर, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता २०२३ चे क ३०३(२) सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून संगमनेर पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,503
अमोल जोंधळे कारवाई धीरज मांजरे बेकायदा वाळू वाहतूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

By अनंत पांगारकरJuly 30, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई / संगमनेर: संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ…

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.