Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; पती-पत्नीला अटक
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; पती-पत्नीला अटक

विशाल गवळीविरोधात याआधीदेखील चार विनयभंगाचे गुन्हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याने आतापर्यंत तीन लग्ने केली असून, सध्या तो तिसऱ्या बायकोबरोबर राहतो. पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत त्याच्या तिसऱ्या पत्नीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/12/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, २६ डिसेंबर

एका १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या पती-पत्नीला अटक केली आहे. अटक केलेल्या पती-पत्नीला कल्याणच्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याण पूर्व येथे ही घटना घडली. विशाल गवळी असे यातील मुख्य आरोपीचे नाव असून त्याला बुलढाणा येथून अटक करण्यात आली. तर पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत पत्नीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी कल्याण पूर्व येथील नागरिकांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली निषेध मोर्चा काढत विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

कल्याण पूर्व येथील एका अल्पवयीन मुलीचे २३ तारखेला संध्याकाळी अपहरण झाले होते. आईकडून २० रुपये घेऊन ही अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. मात्र, ती परत न आल्याने कुटुंबियांनी मुलीचा शोध सुरू केला. बराच कालावधी उलटूनही मुलगी परत न आल्याने मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली.

दुसऱ्या दिवशी २४ डिसेंबरला मुलीचा मृतदेह कल्याणनजीक बापगाव परिसरात सापडला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके तयार केली होती. प्राथमिक तपासणीत या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणातील दोन आरोपींची ओळख पटवली. त्याच परिसरात राहणारा विशाल गवळी आणि त्याची पत्नी या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशाल गवळीविरोधात याआधीदेखील चार विनयभंगाचे गुन्हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याने आतापर्यंत तीन लग्ने केली असून, सध्या तो तिसऱ्या बायकोबरोबर राहतो. पतीच्या दुष्कृत्यावर पडदा टाकत त्याच्या तिसऱ्या पत्नीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने विशाल गवळीचा शोध सुरू करत त्याला बुलढाणा येथील शेगाव येथून अटक केली. तसेच पोलिसांनी या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली रिक्षादेखील ताब्यात घेतली आहे. या रिक्षाचालकाचा गुन्ह्यात किती सहभाग आहे, याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.

अशी घडली घटना – विशालने सायंकाळी पाच वाजता अल्पवयीन मुलीला फूस लावून घरात घेतले व मुलीसोबत गैरकृत्य करून तिची हत्या केली. त्यानंतर एका मोठ्या बॅगेमध्ये त्याने मुलीचा मृतदेह भरून ठेवला. सायंकाळी सात वाजता पत्नी घरी आली, तेव्हा घडलेला प्रकार त्याने पत्नीला सांगितला. पतीने केलेले कृत्य ऐकून पत्नीला धक्का बसला. नंतर दोघांनी पुरावे नष्ट करण्यासाठी आधी घरातले रक्त पुसले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याची योजना आखली. रात्री साडेआठ वाजता विशालने मित्राची रिक्षा बोलावून घेतली व दोघेही मृतदेह घेऊन नऊ वाजता बापगावच्या दिशेने रवाना झाले. मृतदेह फेकून दोघे परतले, परतत असताना विशालने आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली आणि तेथून आपल्या पत्नीच्या माहेरी बुलढाणा येथे तो निघून गेला. मात्र, घराजवळ सापडलेल्या रक्तामुळे विशालनेच हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,346
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.