Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुजरातच्या दोघा व्यापाऱ्यांनी संगमनेरमधील फ्लॉवर विक्रेत्या भागीदारांची सुमारे पंधरा लाखाची केली फसवणूक
गुन्हेगारी

गुजरातच्या दोघा व्यापाऱ्यांनी संगमनेरमधील फ्लॉवर विक्रेत्या भागीदारांची सुमारे पंधरा लाखाची केली फसवणूक

आरोपींनी पैसे देणे बंद केल्याने फिर्यादीने फोन करून आरोपींकडे पैशाची मागणी केली असता पैसे आज देतो, उद्या देतो अशी बतावणी परत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २८ डिसेंबर 

संगमनेर – गुजरातच्या दोघा व्यापाऱ्यांनी संगमनेरमधील शेतमाल विक्रेत्याची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

येथील शेतमाल व्यापारी प्रशांत प्रताप नेहे रा. समनापुर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मनोज भारवाड व सुरेश भारती या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गेल्या पंधरा वर्षांपासून फ्लॉवर व टोमॅटो विक्रीचा व्यवसाय करत गेल्या पाच वर्षांपासून पांडुरंग माधव चांडे (रा. समनापुर) हे त्यांचे भागीदार असून दोघेही आपला शेतमाल बाहेरील राज्यात विक्रीसाठी पाठवीत असतात. फिर्यादी व्यापारानिमित्त अहमदाबाद येथे गेले असताना त्यांची दोन वर्षांपूर्वी मनोज भारवाड व सुरेश भारती (रा. अहमदाबाद, गुजरात) यांच्याशी ओळख झाली. या ओळखीतून धारवाड व भारती यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना फ्लावर विक्री करण्यास सुरुवात केली.

३ जुलै २०२४ रोजी मनोज भारवाड यांच्या सांगण्यावरून सुरेश भारती याने संगमनेर येथे फिर्यादी कडून फ्लॉवर खरेदी घेण्यास सुरुवात केली. तसेच भारती हा यादरम्यान संगमनेरमध्येच थांबला होता. या दोघा शेतमाल विक्रेत्यांसह भारती हा फ्लॉवरचा माल पाहून त्याची खरेदी करून सदरचा माल हा मनोज भारवाड यांच्याकडे पाठवत होता.

माल मिळाल्यानंतर धारवाड व भारती एक-दोन दिवसात फ्लॉवरचे पैसे रोख स्वरूपात देत असत. दोघांनीही पहिल्या आठवड्यात व्यवस्थित व्यवहार केल्यानंतर फिर्यादी व त्याच्या भागीदाराने आरोपींना त्यानंतर महिनाभराच्या कालावधीत १८ ट्रक माल पाठविला. या मालाची किंमत २९,७१,२३५ रुपये एवढी होती. या मालापोटी आरोपींनी फिर्यादी व त्याच्या भागीदाराला १५,४०,००० रुपये रोख स्वरूपात पाठविले. तर उर्वरित १४,३१,२३५ रुपये बाकी ठेवले होते.

त्यानंतर आरोपींनी पैसे देणे बंद केल्याने फिर्यादीने फोन करून आरोपींकडे पैशाची मागणी केली असता पैसे आज देतो, उद्या देतो अशी बतावणी परत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यातील दुसरा आरोपी सुरेश भारती हा संगमनेर येथेच राहत असल्याने या दोन्ही व्यापाऱ्यांना पैसे मिळतील याचा विश्वास होता.

मात्र एक ऑगस्ट रोजी सुरेश भारती हा आरोपी अचानकपणे संगमनेर येथून अहमदाबादला निघून गेला त्यामुळे फिर्यादीने अहमदाबाद येथे जात आरोपींकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे फिर्यादीची सुमारे पंधरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

नेहे यांच्या तक्रारीवरून संगमनेर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,005
गुन्हेगारी फसवणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.