Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कवी अनंत फंदी नाट्यगृह नव्या वर्षात शहराच्या वैभवात भर घालेल – मुख्याधिकारी कोकरे
क्रिडा व कला

कवी अनंत फंदी नाट्यगृह नव्या वर्षात शहराच्या वैभवात भर घालेल – मुख्याधिकारी कोकरे

नाट्यगृहात आवश्यक ऊर्जेसाठी सौर ऊर्जेच्या पर्यायावरदेखील चर्चा करण्यात आली. नाट्यगृहाच्या नूतनीकरणाबाबत वेळोवेळी आलेल्या योग्य सूचनांचा अंतर्भाव केला जाईल. याबाबत प्रशासनाच्यावतीने कोकरे यांनी उपस्थित त्यांना खात्री दिली. तसेच आपल्या मुख्याधिकारी पदाच्या वेंगुर्ले येथील कार्यकाळातील नाट्यगृह बांधणीचा अनुभव यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, ०२ जानेवारी 

संगमनेर – संगमनेर मधील कवी अनंत फांदी नाट्यगृह बंदिस्त करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून नव्या वर्षात हे नाट्यगृह शहराच्या वैभवात भर घालेल, असा विश्वास संगमनेर नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे.

नाट्यगृह बंदिस्त करण्याचे काम सुरू असून या संदर्भात रंगभूमीशी निगडित नाट्यकर्मीं व संगमनेरकरांच्या सूचना विचारात घेता याव्या, यासाठी संगमनेर नाट्य परिषदेच्यावतीने कोकरे यांना निवेदन देण्यात आले होते. नाट्यकर्मींच्या या निवेदनाला प्रतिसाद देत मुख्याधिकारी कोकरे यांनी मंगळवारी सकाळी नाट्यगृहामध्ये अधिकारी, वास्तु विशारद आणि उपस्थित कलाकार यांच्याशी संवाद साधला.

वास्तुविशारद अरविंद वैद्य यांनी उपस्थित रंगकर्मींना नियोजित नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत माहिती दिली. त्याबरोबरच प्रत्यक्ष पाहणीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यावर प्रश्नांवर चर्चा झाली आणि सदर बाबी कामामध्ये अंतर्भूत करण्यात येतील. सदर काम सुरू असून सध्या त्याबाबत काही सूचना करायच्या असतील तर त्या स्वागतार्ह असतील असे सांगितले. एकंदरीत प्रशासनाची भूमिका ही सर्वसमावेशक सूचना अंतर्भूत करून एक सुसज्ज नाट्यगृह संगमनेर येथे चालू वर्षात पूर्णत्वास नेण्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे.

नाट्यगृहात आवश्यक ऊर्जेसाठी सौर ऊर्जेच्या पर्यायावरदेखील चर्चा करण्यात आली. नाट्यगृहाच्या नूतनीकरणाबाबत वेळोवेळी आलेल्या योग्य सूचनांचा अंतर्भाव केला जाईल. याबाबत प्रशासनाच्यावतीने कोकरे यांनी उपस्थित त्यांना खात्री दिली. तसेच आपल्या मुख्याधिकारी पदाच्या वेंगुर्ले येथील कार्यकाळातील नाट्यगृह बांधणीचा अनुभव यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितला.

मुख्याधिकारी आणि नाट्यकर्मी यांच्यात झालेल्या चर्चेत ज्येष्ठ रंगकर्मी शांती फाऊंडेशनचे डॉ. सोमनाथ मुटकुळे, संग्राम संस्थेचे सूर्यकांत शिंदे, रंगकर्मी प्रतिष्ठानचे अंतुन घोडके, नाटकवाले संस्थेचे डॉ. अमित शिंदे, संगमनेर साहित्य परिषदेचे अरविंद गाडेकर, अनिल सोमनी, संगीत क्षेत्रातील सत्यजित सराफ, शालेय-महाविद्यालयीन रंगभूमीशी निगडित सौरभ म्हाळस, सुभाष कानडे, परिषदेचे कार्यवाह विशाल कदम यांनी भाग घेत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. मुख्याधिकाऱ्यांच्या वेंगुर्ले येथील नाट्यगृह बांधणीच्या कामाचा अनुभव या कामात देखील उपयोगात येईल अशी अशा व्यक्त करत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य व संगमनेर नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय कुमार दळवी यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 794
कवी अनंत फंदी नाट्यगृह रामदास कोकरे संजयकुमार दळवी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.