Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » केंद्रीय मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, युवा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली; मंत्री आमदारांच्या उपस्थितीत झालेला राडा चर्चेत!
राजकारण

केंद्रीय मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, युवा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली; मंत्री आमदारांच्या उपस्थितीत झालेला राडा चर्चेत!

अंतर्गत धूमसत असलेले हे शितयुद्ध गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर अनपेक्षितपणे उफाळून आले. याचबरोबर मतदार संघात प्रामुख्याने चर्चेचा विषय बनलेला दहशतवादाचा मुद्दा देखील पुन्हा समोर आला आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान गुरुवारी रात्री त्रंबकेश्वर येथे जाण्यासाठी संगमनेरला काही काळ थांबले होते. भाजप पदाधिकारी आणि आमदार खताळ यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 3, 2025Updated:January 3, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

भाजप आणि आमदार खताळ समर्थकांमधील वादाने दहशतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

संगमनेर, ०३ डिसेंबर

समाज माध्यमातील पोस्ट आणि एकमेकांना टाँट मारण्यावरून भाजपच्या दोघा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावरण थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि संगमनेरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमानंतर झालेल्या हाणामारीची चर्चा शहरात आणि समाज माध्यमात सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुखांसमोर हाणामारी करणारे हे पदाधिकारी कार्यकर्ते कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर व विश्वासू समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना अचानकपणे शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दहशतीच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष निवडणूक लढविण्यास इच्छुक होता मात्र ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गटाच्या) वाट्याला गेला. अशातच सोबत असले तरी आमदार खताळ समर्थक आणि मूळ भाजप समर्थक यांच्यात अंतर्गत शीतयुद्ध सुरू होते.

अंतर्गत धूमसत असलेले हे शितयुद्ध गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर अनपेक्षितपणे उफाळून आले. याचबरोबर मतदार संघात प्रामुख्याने चर्चेचा विषय बनलेला दहशतवादाचा मुद्दा देखील पुन्हा समोर आला आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान गुरुवारी रात्री त्रंबकेश्वर येथे जाण्यासाठी संगमनेरला काही काळ थांबले होते. भाजप पदाधिकारी आणि आमदार खताळ यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.

काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकारी व आमदार समर्थक यांच्यामध्ये सोशल मिडीयामधून वाद झाला असल्याची चर्चा आहे. हा वाद काल अचानक उफाळुन आला. विश्रामगृह येथेच हे दोघे आमने सामने येताच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर वादात झाले. खताळ समर्थक कार्यकर्त्याने भाजपाच्या या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याने या पदाधिकाऱ्याचा हाणामारीत चेहरा सुजला होता. त्यामुळे या प्रकाराची परिसरात एकच चर्चा सुरू झाली. आता भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या समर्थकांचेच वाद असे चव्हाट्यावर येत असल्याने संगमनेर तालुक्यामध्ये नव्या वादाला नवे तोंड फुटण्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नगरपालिका निवडणुकीत अंतर्गत वाद पुन्हा समोर येणार… आपल्या चाळीस वर्षाच्या राजकीय इतिहासात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. विखे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) तिकिटावर निवडणूक लढवत थोरात यांचा पराभव केला होता. त्यानंतर संगमनेरात मंत्री विखे यांनी खताळ यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा नारा दिल्याने मूळ भाजप समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीचा फटका भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद नगर परिषद बसण्याची चिन्ह आहे.

भाजपकडून गंभीर दाखल… दरम्यान गुरुवारी रात्री झालेल्या खताळ आणि भाजप समर्थक कार्यकर्त्यातील वादाची दखल भारतीय जनता पक्षाने घेतली असून यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्याची व या प्रकाराची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 2,747
अमोल खताळ राडा शिवराज सिंह चौहान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

By अनंत पांगारकरJune 13, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील भरारी पथक क्रमांक २…

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.