Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यस्तरीय स्मृती पुरस्कारांची घोषणा… सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबे यांना, डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला तर सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजी मंत्री राजेश टोपे टोपेंना जाहीर
महाराष्ट्र संवाद विशेष

राज्यस्तरीय स्मृती पुरस्कारांची घोषणा… सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार डॉ. रावसाहेब कसबे यांना, डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला तर सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजी मंत्री राजेश टोपे टोपेंना जाहीर

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे व युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी यंदाच्या या राज्यस्तरीय स्मृती पुरस्कारांची घोषणा केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/01/2025Updated:04/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

खा. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत १२ जानेवारीला पुरस्कार वितरण

शनिवार, ०४ जानेवारी 

संगमनेर – ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात व कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. रावसाहेब कसबे यांना देण्यात येणार आहे. तर अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला व सहकारातील आदर्श नेतृत्वाचा पुरस्कार राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांना जाहीर करण्यात आला आहे.

यांनी केली घोषणा – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे व युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी यंदाच्या या राज्यस्तरीय स्मृती पुरस्कारांची घोषणा केली.

वितरण कोठे आणि कधी – पुरस्कारांचे वितरण संगमनेरमध्ये प्रेरणा दिनी १२ जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयांमध्ये यशोधन मैदानावर करण्यात येणार आहे. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते तर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

यांची उपस्थिती – यावेळी निवड समितीचे प्रमुख माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. प्रा. अशोक सोनवणे यांनी डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘कृषीरत्न’ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

अण्णासाहेब शिंदे पुरस्कार – कृषी, तंत्रज्ञान, शिक्षण, समाजसेवा आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यास डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे.

भाऊसाहेब थोरात पुरस्कार – साहित्य, समाजसेवा, पर्यावरण, माध्यम आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यास स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने गौरविले जाते. या पुरस्कारासाठी संगमनेरमधील साहित्यिक, प्राध्यापक डॉ. रावसाहेब कसबे यांची निवड करण्यात आली आहे.

सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार – याशिवाय सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या नेतृत्वास सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्कारासाठी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांची निवड करण्यात आली आहे.

आवाहन – तरी प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, महिला, युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 693
राजेश टोपे रावसाहेब कसबे स्मृती पुरस्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.