अहिल्यानगर – युवतीला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधून शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करणाऱ्या तरूणासह त्याला मदत करणाऱ्या पती-पत्नीविरोधात अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात या संदर्भात नगर शहरातील पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.
रोहिदास तुपे (रा. मातुलठाण, ता. श्रीरामपूर), हर्षदा तुपे व अभिषेक कानडे (दोघे रा. वळणपिंप्री ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हर्षदा व अभिषेक पती-पत्नी असून त्यांनी फिर्यादी युवतीची रोहिदाससोबत ओळख करून दिली होती. तेव्हापासून तो फिर्यादीला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. रोहिदास वारंवार फिर्यादी युवतीला त्रास देत होता. पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहे.