Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान – खासदार शाहू महाराज
सामाजिक

भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान – खासदार शाहू महाराज

यशोधन जवळील मैदानात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचा विचार घेऊन या परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी कार्य केले आहे. सहकार व शेती क्षेत्रातील त्यांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान देणारे असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी काढले आहे.

यशोधन जवळील मैदानात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार मोहन जोशी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, प्रभावती घोगरे, दशरथ सावंत, मधुकरराव नवले, राजवर्धन थोरात आदी उपस्थित होते.

खा. शाहू महाराज म्हणाले, भाऊसाहेब थोरात आणि डॉ. आण्णासाहेब शिंदे यांचा वारसा बाळासाहेब थोरात यांनी समर्थपणे जपला आहे. भाऊसाहेबांनी सहकारातून तालुका समृद्ध केला तर अण्णासाहेबांनी देशात हरितक्रांती आणली. हे चांगले दिवस त्यांच्यामुळे आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेरचा सहकार पाहून आनंद झाला.

राज्यात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्र घडवण्यासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. अपघात झाला असेल परंतु त्यातून सावरून कार्यकर्त्यांनी तालुका सांभाळावा. कारण बाळासाहेबांसारखे नेतृत्व हे सध्याच्या राजकारणात दुर्मिळ आहे. चांगल्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या या नेतृत्वाला ताकद द्या असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. यावेळी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांचा झाला पुरस्काराने गौरव…

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने कृषी, तंत्रज्ञान, शिक्षण, समाजसेवा व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) यांना तर सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण, क्षेत्रातील स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांना देण्यात आला. यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्यात आला. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 551
छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

By Annant Ppangarkar24/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या यशोधन जनसंपर्क…

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

शिव्यांची नव्हे तर ओव्यांची संगत धरा; ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे प्रतिपादन

24/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.