संगमनेर – शेतकऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळावी, फॉरेस्ट व गायरान जमिनीचे अतिक्रमित पट्टे अतिक्रमणदारांना कायम करण्यात यावे, वाढीव लाईट विलासह महत्त्वाच्या प्रश्नांवर लढा उभारण्याचा निर्णय कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला.
शनिवारी (११ जानेवारी) संगमनेरमध्ये शताब्दी वर्षानिमित्ताने संगमनेर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शेतकऱ्यांसह सामान्यांच्या प्रश्नासंदर्भात सरकारी धोरणाविरोधात व इतर मागण्यांसाठी निर्णय घेण्यात आले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड अँड. सुभाष लांडे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड डॉ. बन्सी सातपुते यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कॉम्रेड भिका वाघ, कॉम्रेड अशोक डुबे, कॉम्रेड सयाजी कानवडे, कॉम्रेड लहानू हासे, कॉम्रेड बापू कानवडे, कॉम्रेड दशरथ हासे, कॉम्रेड खानेकर आदींसह अखिल भारतीय किसान सभा, फॉरेस्ट वाहतूकदार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉम्रेड ॲड. ज्ञानेश्वर सहाने यांनी प्रास्ताविक केले. तर कॉम्रेड प्रताप सहाने यांनी आभार मानले.