Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी मागणी… बाळासाहेबांच्या स्मारक समिती अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवा!
राजकारण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मोठी मागणी… बाळासाहेबांच्या स्मारक समिती अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवा!

शिंदेंच्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/01/2025Updated:14/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचीत्यावर शिवसेनेचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि आमदार या मेळाव्याला उपस्थित राहतील, असं कदम यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाच्या या मागणीमुळे पुन्हा एकदा शिंदे व ठाकरे गटामधील वाद उफाळून येण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले आमदार प्रसाद लाड यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये स्मारक राज्य सरकारने ताब्यात घेण्याची मागणी केली होती. यावरून मोठा वाद उद्भवला होता.

कदम म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. ठाकरे यांना मला विचारायचं आहे की आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला आहे? तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल बोललात, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटत आहात. तुम्ही तुमचा स्वाभिमान गाणं ठवला आहे का? फडणवीस यांना भेटताना तुम्हाला लाज वाटत नाही का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

ठाकरे शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात? मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की, कोणत्याही परिस्थितीत हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे. स्मारकाचा आणि त्यांचा संबंध राहता कामा नये. याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे स्मारकात गेले तर बाळासाहेब ठाकरे याना दुःख होईल, त्यांच्या मनाला वेदना होतील. ज्यांनी माझे विचार पायदळी तुडविले तो माझा मुलगा माझ्या स्मारकात कसा येऊ शकतो असा विचार ते करतील असे देखील कदम म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 660
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे स्मारक रामदास कदम शिवसेना शिंदे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.