Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सरकारची लाडक्या बहिणींवर संक्रांत, ६० लाख बहिणी होणार नावडत्या; अर्ज होणार बाद
राजकारण

सरकारची लाडक्या बहिणींवर संक्रांत, ६० लाख बहिणी होणार नावडत्या; अर्ज होणार बाद

विधानसभा निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बहिणींना २१०० रुपये देण्यापूर्वीच योजनेतून नावे बाद केले जाणार असल्याचे समोर येत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी संदर्भात महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी मोठ वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत निवडणुकीआधी सरकारने बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच आता सुमारे ६० लाख महिलांचे या योजनेतील अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री भुजबळ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र असलेल्या महिलांना स्वतःहून नावे मागे घेण्यास सांगितले होते. जर बहिणींनी स्वतःहून या योजनेतून नाव काढले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेत अपात्र बहिणींवर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना वेग आला असतानाच सरकारमधील व सरकार बाहेरील नेत्यांच्या वक्तव्यामुळे ही योजना संकटात असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान या योजनेतील ६० लाख महिलांच्या अर्ज बाद होणार असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

योजनेतून बाद होणाऱ्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यामुळे नव्या वर्षात आता सरकारचे संक्रांत लाडक्या बहिणींवर येणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना आमच्या सरकार सुरू ठेवणार आहे. या योजनेत जर कोणी नियमाच्या बाहेर जाऊन पैसे घेतले असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाऊ शकतात.

यामुळे आता लाडक्या बहिणींवर संक्रांत येणार असल्याचे सांगितले जात असून ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याने या निकषांत बाहेर जाऊन जर महिला सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे देखील बोलले जाते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,069
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.