Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शुक्रवारी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे संगमनेरमध्ये… सहकार महर्षी चषकाचा अंतिम सामना आणि पुरस्कार सोहळ्यासाठी राहणार उपस्थित!
क्रिडा व कला

शुक्रवारी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे संगमनेरमध्ये… सहकार महर्षी चषकाचा अंतिम सामना आणि पुरस्कार सोहळ्यासाठी राहणार उपस्थित!

शुक्रवारी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवसही स्टेडियममध्ये होणार असून या २५ व्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण व अंतिम सामना होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – राज्यभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या सहकारमहर्षी T- 20 क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व अंतिम सामन्यासाठी शुक्रवारी (१७ जानेवारी) दुपारी चार वाजता भारताचा माजी कसोटी कर्णधार तथा संगमनेर तालुक्याचा सुपुत्र अजिंक्य रहाणे उपस्थित राहणार आहे. याशिवाय माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एक जानेवारीपासून राज्यस्तरीय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे हे २५ वे वर्ष असून यामध्ये ३२ संघांचा सहभाग आहे. यावर्षी या स्पर्धेत रणजी व आयपीएलमधील काही खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

सतरा दिवस चाललेल्या या स्पर्धेत षटकार, चौकारांच्या आतिषबाजीने स्टेडियम दनानुन गेले. राष्ट्रीय दर्जाचे आयोजन, खेळाडूंना रंगबिरंगी कपडे, संपूर्ण मैदानावर हिरवळ, प्रेक्षकांसाठी चांगली बैठकव्यवस्था, पार्किंग , ऑनलाईन प्रक्षेपण या सर्व आधुनिक सुविधामुळे या स्पर्धेला दररोज दहा हजार प्रेक्षकांची उपस्थिती लाभत आहे.

शुक्रवारी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवसही स्टेडियममध्ये होणार असून या २५ व्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण व अंतिम सामना होणार आहे.

यावेळी भारताचा माजी कसोटी कर्णधार तथा संगमनेर तालुक्याचा सुपुत्र अजिंक्य रहाणे पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहे. तसेच राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, उद्योजक गिरीश मालपाणी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अंतिम सामन्यासाठी संगमनेरमधील तमाम क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. सत्यजित तांबे, जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,380
अजिंक्य रहाणे क्रिकेट स्पर्धा जय हिंद लोक चळवळ बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराचा ऐतिहासिक पराक्रम; सव्वाशे पदकांसह उपविजेतेपदावर कोरले नाव

07/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात गुरुवारी दुपारी एक अत्यंत…

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.