Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील घरफोडीतील आरोपी अहिल्यानगर एलसीबीने मध्यप्रदेशात पकडला, सुमारे सहा लाखाचे दागिने हस्तगत
गुन्हेगारी

संगमनेरमधील घरफोडीतील आरोपी अहिल्यानगर एलसीबीने मध्यप्रदेशात पकडला, सुमारे सहा लाखाचे दागिने हस्तगत

आरोपी विकास उर्फ बंटी सरदारसिंग मिना हा मित्र असून त्याने डिसेंबर २०२४ मध्ये त्याचे पत्नीचे दागीने असल्याचे सांगुन १०-१५ दिवस ठेवण्यासाठी दिले असल्याची माहिती दिली. तसेच तपासात ५ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने त्यात गंठण, नेकलेस, चैन व कर्णफुले असे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 19, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने संगमनेर शहरात घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या आरोपीच्या दुसऱ्या साथीदार फरार असून पोलिसांनी संबंधित आरोपींकडून सुमारे सहा लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले.
गेल्या वर्षी (६ डिसेंबर) संगमनेर शहरातील मालपाणी नगरमध्ये राहत असलेल्या रुपेश मुरलीधर भालेराव (वय ४८, रा. मालपाणीनगर, सुदर्शन बंगला, संगमनेर) यांच्या बंगल्याच्या टेरेस वरील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश मिळवत ३ लाख ७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले होते. याबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.नं. १०१३/२०२४ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
या संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले होते. एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार संदीप पवार, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्यासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक नेमले होते.
या पथकाने संगमनेरच्या मालपाणी नगर मधील गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देवुन आसपासचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा हा विकास सरदारसिंग मिना याने त्याच्या साथीदारासह केल्याचे तपासात निष्पन्न केले. आरोपीच्या शोधासाठी पथकाने मध्यप्रदेश येथे जात आरोपी राहत असलेल्या ठिकाणावर शोध घेतला असता तेथे पथकाला संशयित आरोपी आढळून आला.
पथकाने केलेल्या चौकशीत या संशयित आरोपीचे नाव विकास उर्फ बंटी सरदारसिंग मिना असे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे संगमनेरमधील घरपोडी संदर्भात चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत सदरचा गुन्हा हा आदित्य कंजर (रा. रूलकी, ता. जि. शाजापूर, राज्य मध्यप्रदेश) (फरार) याचेसह केल्याचे सांगीतले.
पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पकडलेल्या आरोपीकडे मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हयातील चोरी केलेले काही दागीने हे त्याचा मित्र निरज मनोज छावडी यास स्वतःचे पत्नीसे दागीने असल्याचे सांगुन दिले व उर्वरीत दागीने हे आदित्य कंजर याचेकडे असल्याचे सांगितले. आरोपीने दिलेल्या माहितीवरून निरज मनोज छावडी याचे राहते घरी जाऊन पथकाने खात्री केला असता तो बाहेरगावी असल्याची माहिती समोर आली.
शनिवारी पथकातील अधिकाऱ्यांनी निरज मनोज छावडी (वय ३०, रा. रूलकी, ता. जि. शाजापूर, राज्य मध्यप्रदेश) याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने पोलिसांनी पकडलेला आरोपी विकास उर्फ बंटी सरदारसिंग मिना हा मित्र असून त्याने डिसेंबर २०२४ मध्ये त्याचे पत्नीचे दागीने असल्याचे सांगुन १०-१५ दिवस ठेवण्यासाठी दिले असल्याची माहिती दिली. तसेच तपासात ५ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने त्यात गंठण, नेकलेस, चैन व कर्णफुले असे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहेत. आरोपी विकास उर्फ बंटी सरदारसिंग मिना याला जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पुढील चौकशीसाठी संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संगमनेर शहर पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,816
एलसीबी घरफोडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

पाच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यासह सात जणांना अटक

June 8, 2026

राजूर ‘फेक मर्डर केस’ : दोन पोलीस निरीक्षक निलंबित, DGP सदानंद दाते आढावा बैठक घेण्याची शक्यता

June 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.