Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आज बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६, आजच्या दिवसाचे राशिभविष्य –

28/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अजबच… संगमनेर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरच्या कुत्र्याविरोधात गुन्हा, हे आहे कारण…
गुन्हेगारी

अजबच… संगमनेर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरच्या कुत्र्याविरोधात गुन्हा, हे आहे कारण…

पाळीव प्राण्यांबद्दल निष्काळजीपणा बाळगल्याने डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना कुत्र्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/01/2025Updated:21/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – अनंत पांगारकर 

पोलीस ठाण्यात दररोज विविध प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. यात आरोपींमध्ये पुरुष, महिला, मुला-मुलींचा समावेश असतो. मात्र गेल्या आठवड्यात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका डॉक्टरच्या कुत्र्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

गेल्या बुधवारी घडलेल्या या प्रकारासंदर्भात रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेने दिलेल्या जबाबावरून पाळीव कुत्र्या विरोधात दाखल झालेल्या या गुन्ह्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. आरोपीमध्ये प्रथमत:च एका पाळीव कुत्र्याचा समावेश असल्याने पोलीस याप्रकरणी नेमका काय तपास करतात, याकडे लक्ष लागले आहे.

संगमनेर शहरालगत घुलेवाडी शिवारात असलेल्या नवशीचा मळा येथे गेल्या बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भात रविवारी पोलिसांनी नवशीचा मळा, घुलेवाडी, ता. संगमनेर येथील महिलेने रुग्णालयात उपचार घेताना दिलेल्या जबाबावरून हा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी महिलाही शहरालगत असलेल्या घुलेवाडी शिवारातील नवशीचा मळा येथे कुटुंबासह राहावयास आहे. तिथेच डॉ. पानसरे हे राहावयास असून त्यांच्याकडे रॉट व्हीलर जातीचा पाळीव कुत्रा आहे.

हा कुत्रा फिर्यादी महिलेच्या घराच्या परिसरातील नागरिकांच्या अंगावर गेला असून त्यात ते जखमी झाले आहे. बुधवारी देखील (१५ जानेवारी) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला तिच्याकडील दुचाकीवरून मुलीला शाळेतून घेऊन घरी येत असताना घराजवळ असलेल्या डॉ. पानसरे यांच्याकडील पाळीव कुत्रा गेटमधून दुचाकी चालवत असलेल्या फिर्यादी महिलेच्या अंगावर आला.

त्यामुळे फिर्यादी महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात फिर्यादी महिलेला मार लागून ती जखमी झाली. सदरचा अपघात हा डॉक्टर पानसरे यांचा कुत्रा अंगावर आल्याने झाला असल्याचे म्हटले आहे. पोलीस ठाण्यात या संदर्भात डॉक्टर पानसरे यांच्या पाळीव कुत्र्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २९१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गजानन वाळके करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 3,590
अपघात डॉ. पानसरे पाळीव कुत्रा संगमनेर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

25/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

By Annant Ppangarkar28/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दैनिक युवावार्ता, युवा पॉलिप्रिंट आणि युवा उद्योग समूहाचे संचालक सुदीप किसन…

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आज बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६, आजच्या दिवसाचे राशिभविष्य –

28/10/2026

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.