Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

08/10/2026

गुरुवार, ०८ ऑक्टोंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

08/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पत्रकार सन्मान योजना एप्रिल पासून २० हजार रुपये, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
पत्रकारिता

पत्रकार सन्मान योजना एप्रिल पासून २० हजार रुपये, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/01/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

राज्यातील बुजुर्ग पत्रकारांना सन्मानाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी विधीमंडळ वार्ताहर संघाने सुचवलेल्या दुरुस्त्यांचा शासकीय स्तरावर विचार केला जाईल. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून त्रुटी दूर करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. तोवर सध्या सुरु असलेल्या सन्मान योजनेतील मासिक ११ हजार रुपयांची रक्कम येत्या आर्थिक वर्षांपासून २० हजार रुपये करण्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२३ व सन २०२४ च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, सरचिटणीस प्रवीण पुरो उपाध्यक्ष महेश पवार, खजिनदार विनोद यादव आदी उपस्थित होते.

सन्मान योजनेच्या ठेव रकमेत वाढ करण्यासाठी ५० कोटी रुपये शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण योजनेत जमा करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी करूनच मी कार्यक्रमाला आलो आहे, असं जाहीर करत पवार यांनी या योजनेतील वाढीव रक्कम एप्रिल महिन्यापासूनच पत्रकारांच्या खात्यात जमा होतील असे जाहीर केलं.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्या पत्रकारांनी, निर्भिड पत्रकारिता केली. पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांचा वारसा, परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. सध्या तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे माध्यम क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, आणि सोशल मीडियाने माध्यमांचे रूप पालटले आहे. आज बातम्या केवळ वृत्तपत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मोबाइलवर, सोशल मीडियावर काही सेकंदांत बातम्या पोहोचतात. माध्यमांचा वेग झपाट्याने वाढला आहे.

त्यातच आता माध्यम क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून या क्षेत्रावर ‘एआय’चा मोठा प्रभाव पडणार आहे. ‘एआय’ आपल्याला सहाय्यक ठरू शकतो, मात्र पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्य, पारदर्शकता, आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये केवळ पत्रकारच जपू शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माध्यम क्षेत्रात बदल होत असताना मीडिया ट्रायल सारखी आव्हानेही समोर येत आहेत. ‘मीडिया ट्रायल’मुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि एखाद्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकते, एखाद्याचे करिअर संपू शकते. माध्यमांनी सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चुकीच्या गोष्टीवर टीका करणे, टीपणी करणे हा माध्यमांचा हक्क आहे. सगळीकडे नकारात्मक गोष्टी घडताना चांगल्या, सकारात्मक गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर येणे आवश्यक असल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले.

वार्ताहर संघाने आपल्या सदस्यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने पुरस्कार देण्याची ही बाब कौतुकास्पद असून अशारितीने आपल्याच सदस्यांचा गुणगौरव करणारा आपला एकमेव संघ असावा. मंत्रालय वार्ताहर संघाकडून, मंत्रालयात दिला जाणारा हा पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाला अधिक प्रकाशमान करणारा ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विजय चोरमारे आजच्या माध्यम क्षेत्राविषयी मत व्यक्त करताना म्हणाले की, सध्याच्या पत्रकारितेपुढे मोठे आव्हाने निर्माण झाली आहेत. गंभीरपणे व प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यास मध्यवर्ती पत्रकारितेमध्ये स्थान राहिले नाही. मात्र, तरीही गंभीरपणे व प्रामाणिकपणे काम करणारे पत्रकार स्वतःची जागा निर्माण करत आहेत. पत्रकारांना समाजातील समस्या जाणून घेऊन त्याचे वार्तांकन करण्यासाठी माध्यम संस्थांनी पाठबळ देणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोवीड काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोगे काम केले आहे. मात्र, माध्यमांनी याची अधिक दखल घेणे गरजेचे होते असे चोरमारे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिताली तापसे यांनी केले तर आभार यादव यांनी मानले. निवड समिती सदस्य सर्वश्री अभय देशपांडे, मंदार पारकर, खंडूराज गायकवाड, सुरेंद्र गांगण, संजय बापट व भगवान परब यांचा यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुरस्कार्थींची नावे :

कै. कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार

जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत (सन २०२३) आणि श्रीमती ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी (सन २०२४)

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन २०२४:

मुद्रित माध्यम – संदिप आचार्य, (लोकसत्ता)

वृत्तवाहिनी –पत्रकार विनया देशपांडे, सीएनएन आयबीएन

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वार्ताहर संघ सदस्य – ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे, लोकमत, मुंबई

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन २०२४:

मुद्रित माध्यम –ज्येष्ठ पत्रकार प्रगती पाटील, लोकमत सातारा

वृत्त वाहिनी – मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे

वार्ताहर संघाच्या सदस्यांमधून दिला जाणारा पुरस्कार राजन शेलार, पुढारी.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 679
अजित पवार पत्रकार सन्मान योजना प्रवीण पुरो
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख ज्ञानेशाच्या नावानं भाजपचं चांगभलं!

27/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे वयाच्या…

गुरुवार, ०८ ऑक्टोंबर —- जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

08/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.