Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लग्नाचे आमिष दाखवून १२ ते १५ वर्षे बळजबरीने अत्याचार; शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह दोघा डॉक्टरांवर गुन्हा

24/11/2026

आज मंगळवार २४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य

24/11/2026

पुढील आवर्तने फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच; पाण्यासह खर्चातही काटकसर करा : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

23/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर ग्रंथोत्सवाचे २६ जानेवारीला उद्घाटन, हुतात्मा स्मारक येथून ग्रंथदिंडीचे आयोजन; दोन दिवस साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी
महाराष्ट्र संवाद विशेष

अहिल्यानगर ग्रंथोत्सवाचे २६ जानेवारीला उद्घाटन, हुतात्मा स्मारक येथून ग्रंथदिंडीचे आयोजन; दोन दिवस साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

अहिल्यानगर 'ग्रंथोत्सव २०२४' च्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिक, ग्रंथप्रेमी, ग्रंथविक्रेते, रसिक वाचक, नागरिक यांना ग्रंथ हाताळण्याची, वाचनाची व खरेदी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. ग्रंथोत्सवात सवलतीच्या दरात शासकीय प्रकाशने आणि विविध दर्जेदार ग्रंथ उपलब्ध होतील.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/01/2025No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर दि. २३ – 

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे २६ व २७ जानेवारी २०२५ रोजी दोन दिवसीय अहिल्यानगर ‘ग्रंथोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी (२६ जानेवारी) सकाळी १० वाजता जलसंपदा, (गोदावरी व कृष्ण खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे भूषविणार आहेत.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार अमोल खताळ, आमदार हेमंत ओगले, आमदार विठ्ठल लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रा. ह. दरे, सेक्रेटरी ॲड. वि. द. आठरे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तत्पूर्वी, ग्रंथोत्सवानिमित्त २६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शिवाजी महाराज स्मारक (हुतात्मा स्मारक) लाल टाकी रोड येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. ग्रंथदिंडीचा शुभारंभ महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दैनिक प्रभातचे संपादक जयंत कुलकर्णी, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उद्योजक, वक्ता व लेखक एन. बी. धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ग्रंथ दिंडीचा समारोप राजर्षी शाहू महाराज सभागृह येथे होणार आहे.

ग्रंथोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमानंतर सकाळी ११ वाजता प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थी देशभक्तीपर समूहगीत गायन सादर करणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मकरंद खरवंडीकर तर प्रमुख अतिथी म्हणून दै. सकाळचे निवासी संपादक प्रकाश पाटील उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता ‘अभिजात मराठी भाषा एक साहित्यिक प्रवास’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे असतील. तज्ज्ञ साधनव्यक्ती म्हणून प्रेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावीत, दै. लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, मसापचे शाखाध्यक्ष किशोर मरकड हे परिसंवादात सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ४ वाजता ‘वाचन संस्कृती आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे असतील. तज्ज्ञ साधनव्यक्ती म्हणून महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर, आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख डॉ. राजेंद्र दासरी, दैनिक समाचारचे संपादक ज्ञानेश कुलकर्णी, शब्दगंध साहित्यिक परिषद, शाखा पाथर्डीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजकुमार घुले हे परिसंवादात सहभागी होणार आहेत.

सोमवार २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता निमंत्रित कवींचे ‘कविसंमेलन’ होणार आहे. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक माजी आमदार लहू कानडे, सिने गीतकार व साहित्यिक बाबासाहेब सौदागर उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ११.३० वाजता ‘ग्रंथालये : लोकशिक्षणाची संस्कार केंद्रे’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे असतील. तज्ज्ञ साधनव्यक्ती म्हणून न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, साहित्यिक डॉ. बापू चंदनशिवे, दै. नवा मराठाचे संपादक सुभाष गुंदेचा, दै. दिव्य मराठीचे उपसंपादक बंडू पवार, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेजच्या ग्रंथपाल संगिता निमसे परिसंवादात सहभागी होणार आहेत.

दुपारी १२.३० वाजता ‘भारतीय ग्रंथालय चळवळीतील आश्रयदाते महाराजा सयाजीराव गायकवाड’ या विषयावर जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांचे व्याख्यान होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक स्वप्निल तनपुरे, संजय बोरूडे, सुनिल गोसावी, दैनिक सार्वमतचे संपादक अनंत पाटील, न्यु आर्टस कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ उपस्थित राहणार आहेत.

दुपारी ३ वाजता प्रसिद्ध हास्य कवी डॉ. विष्णू सुरासे यांचा ‘हास्यतरंग’ हा विनोदी कवितांवर अधारित रंगतदार कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर हे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक जयंत येलुलकर, दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक राजेंद्र झोंड, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे हे उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ४ वाजता अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२४ समारोप होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाजचे सहसचिव जयंतराव वाघ, लोकआवाजचे संपादक तथा प्रेसक्लबचे अध्यक्ष विठ्ठलराव लांडगे, ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे अभिरक्षक संतोष यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अहिल्यानगर ‘ग्रंथोत्सव २०२४’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्यिक, ग्रंथप्रेमी, ग्रंथविक्रेते, रसिक वाचक, नागरिक यांना ग्रंथ हाताळण्याची, वाचनाची व खरेदी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. ग्रंथोत्सवात सवलतीच्या दरात शासकीय प्रकाशने आणि विविध दर्जेदार ग्रंथ उपलब्ध होतील. तसेच प्राथमिक व माध्यमिक शालेय विद्यार्थींचे देशभक्तीपर समुहगीत गायन, परिसंवाद, व्याख्यान, हास्यतरंग व कवी संमेलनातून दोन दिवस मनोरंजन व ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे.

जिल्ह्यातील रसिक नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर आणि ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 364
ग्रंथोत्सव
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर- अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे सोमवारी लोकार्पण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत सोहळा; नाटकांचे उत्पन्न दुष्काळ निधीला देणार

22/11/2026

संगमनेर तालुक्यात महसूल विभागाचा दणका; ५० वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

17/11/2026

भाऊबीज : ओवाळणीच्या ताटापलीकडचे बहिणीच्या प्रेमाचे ऋण!

10/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

लग्नाचे आमिष दाखवून १२ ते १५ वर्षे बळजबरीने अत्याचार; शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह दोघा डॉक्टरांवर गुन्हा

By Annant Ppangarkar24/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर गेल्या १२ ते १५ वर्षांपासून बळजबरीने…

आज मंगळवार २४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य

24/11/2026

पुढील आवर्तने फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच; पाण्यासह खर्चातही काटकसर करा : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

23/11/2026

सावरगाव तळचा सामूहिक विकास पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक : तहसीलदार धीरज मांजरे

23/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.