मुंबई : बदलापूर डोंबिवलीनंतर आता मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या स्टेशन परिसरात एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात ब्लेड आणि दगड लपवल्याची घटना घडली आहे.
राम मंदिर स्टेशनच्या आवारात २० वर्षीय तरूणी बेशुद्ध अवस्थेत आढळली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.
राम मंदिर स्टेशन परिसरात पीडित २० वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळली. बेशुद्ध अवस्थेतील या तरुणीला मंगळवारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या गुप्तांगातील ब्लेड व दगड काढण्यात आले आहेत. शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी या तरुणीचा जवाब नोंदवला असून तिने जवाबात एका रिक्षा चालकाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे तिने सांगितले.
नराधम रिक्षाचालकाने एवढ्यावरच न थांबता त्याने पीडित मुलीच्या गुप्तांगावर ब्लेडचे आणि सिझेरियन ब्लेडने वार केले असल्याचं पीडितेने सांगितलं. दरम्यान पोलीस संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेत असून राम मंदिर स्टेशन आवारातील सिसिटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. तसेच आरोपीच्या अधिक माहितीसाठी व त्याच्या शोधासाठी इतर रिक्षाचालकांची कसून चौकशी करत आहेत.



