Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्यघटनेमुळे समानतेसह विविध मूलभूत स्वातंत्र्य, भारतीय राज्यघटना ही जगातील आदर्श : माजी मंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद विशेष

राज्यघटनेमुळे समानतेसह विविध मूलभूत स्वातंत्र्य, भारतीय राज्यघटना ही जगातील आदर्श : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

सहकाराच्या माध्यमातून सुरू असलेली ही वाटचाल आपल्याला कायम ठेवायची असून संगमनेरचे सुसंस्कृत राजकारण, विकास काम, समृद्ध अर्थव्यवस्था जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. २६ जानेवारी –

भारतीय राज्यघटनेने सर्वांना समानतेसह स्वातंत्र्य व विविध मूलभूत अधिकार दिले आहेत. ही राज्यघटना जपणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून जगातील सर्वात आदर्श अशी आपल्या भारताची राज्यघटना असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात थोरात बोलत होते.

कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, रामहरी कातोरे, डॉ. तुषार दिघे, रोहिदास पवार, ॲड. अशोक हजारे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, रामदास तांबडे आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

थोरात म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधींसह अनेकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासह जगाला सर्वोत्तम अशी राज्यघटना दिली आहे. या राज्यघटनेमुळे आपणा सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, समानतेचे स्वातंत्र्य मिळाले आहे. राज्य घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे सरकार देखील ठरविण्याचा अधिकार सामान्य नागरिकांना मिळाला आहे. राज्य घटनेमध्ये देशाचे हीत, सीमांचे रक्षण, देशाची प्रगती, देशातील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकाऱ्याचे रक्षण याचे तत्व सांगितले आहे.

जगात सर्वोत्तम असलेली आपली राज्यघटना चिरायू राहिली पाहिजे. ही राज्यघटना अधिक सामर्थ्यवान होण्यासाठी सर्वांनी पुढील काळात कटिबद्ध राहणे आवश्यक असून राज्यघटनेतील मूलभूत तत्वांना कोणाकडूनही कोणताही धक्का लागणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

आपल्या संगमनेर मधील सहकार चळवळ ही देशासाठी लौकिकास्पद ठरली असून अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचा सातत्याने गौरव झाला आहे. सहकाराच्या माध्यमातून सुरू असलेली ही वाटचाल आपल्याला कायम ठेवायची असून संगमनेरचे सुसंस्कृत राजकारण, विकास काम, समृद्ध अर्थव्यवस्था जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे.

कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांना नुकताच मिळालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आदर्श कार्यकारी संचालक पुरस्काराबद्दल कौतुक करताना हा पुरस्कार आपल्या चांगल्या कामाचा असल्याचे थोरात यांनी सांगितले.

सुरक्षा अधिकारी मोहन म्हस्के, महेश म्हस्के, बाळासाहेब जामखेड यांच्या नेतृत्वाखाली विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी परेड संचालन करून ध्वजास मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.

कार्यकारी संचालक घुगरकर यांचा सत्कार-

थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांना पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने राज्यातील उत्कृष्ट कार्यकारी संचालक म्हणून १ लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. याबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यावेळी घुगरकर यांचा सत्कार करण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 354
अमृत उद्योग समूह बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.