Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी “ग्रंथालय ऑन व्हील” उपक्रम राबविण्यासाठी निधी देणार – जिल्हाधिकारी सालीमठ
महाराष्ट्र संवाद विशेष

ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी “ग्रंथालय ऑन व्हील” उपक्रम राबविण्यासाठी निधी देणार – जिल्हाधिकारी सालीमठ

गेल्या वर्षी या ग्रंथोत्सवात राज्यात सर्वाधिक ग्रंथाची विक्री अहिल्यानगर जिल्ह्यात झाली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
अहिल्यानगर दि. २६ जानेवारी-
आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती कायम टिकवून ठेवण्यासाठी ग्रंथोस्तवासारखे उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहेत. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी “ग्रंथालय ऑन व्हील” हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याचे आश्वासन अहिल्या नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहे.
शहरातील राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक चे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव ॲड. विश्वासराव आठरे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, ग्रामीण भागात आठवडे बाजारसारख्या गर्दीच्या ठिकाणी फिरते ग्रंथालय सुरू केल्यास वाचन संस्कृतीचा प्रसार होईल. अशी दोन ‘ग्रंथालय ऑन व्हील’ सुरू करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला जाईल. जिल्हा ग्रंथालयाची नव्याने उभारण्यात येणारी इमारती सर्व सुविधांनी सुसज्ज असावी. ग्रंथालयात वाचकांसाठी अत्याधुनिक सुविधा असतील याकडे लक्ष द्यावे.
जगभरातील साहित्यिकांचे विचार वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी शासनामार्फत ग्रंथोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लेखक आणि वाचकातील नाते दृढ होण्यास मदत होईल. साहित्यातून विचार आणि संस्कार मिळत असल्याने ते पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी ग्रंथोत्सव, पुस्तक मिळावे, वाचक मिळावे अशा उपक्रमाचे सातत्याने आयोजन आवश्यक आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असून मराठी भाषेचे महत्व नागरिकांसमोर मांडण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या परिसंवादाचे सातत्याने आयोजन आवश्यक आहे.
प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, वाचन संस्कृती टिकावी व वाढावी यासाठी शासनामार्फत ग्रंथोस्तवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. गेल्या वर्षी या ग्रंथोस्तवात राज्यात सर्वाधिक ग्रंथाची विक्री अहिल्यानगर जिल्ह्यात झाली होती. जिल्हाभरात ४७४ सार्वजनिक वाचनालय असून या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील जनतेला वाचनाचे सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथसंवाद शासकीय तसेच विविध प्रकाशाच्या दर्जेदार पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवावेळी विविध पुरस्कार प्राप्त ग्रंथालय, कार्यकर्ता, सेवक, साहित्यिक तसेच ग्रंथवाचक निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 320
ग्रंथोत्सव सिद्धाराम सालिमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.