Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासगी गाडीवर पोलीस पाटी लावून फिरणाऱ्यांची पोलिसाला दादागिरी, फिर्याद देण्यासाठी पोलिसालाच पोलीस ठाण्यात बसावे लागले सहा तास; दमबाजी, शिवीगाळ होऊनही केवळ अदखलपात्र गुन्हा
गुन्हेगारी

खासगी गाडीवर पोलीस पाटी लावून फिरणाऱ्यांची पोलिसाला दादागिरी, फिर्याद देण्यासाठी पोलिसालाच पोलीस ठाण्यात बसावे लागले सहा तास; दमबाजी, शिवीगाळ होऊनही केवळ अदखलपात्र गुन्हा

माझी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षकांना फोन केला. अहिल्यानगर येथे संपर्क करून विनंती केली. त्यानंतर पंधरा-वीस मिनिटांनी माझी फिर्याद घेतली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. २८-

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील श्री बाळेश्वर मंदिर परिसरात पोलिसांची बिनतारी यंत्रणा आहे. येथे संरक्षण ड्युटीला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चौघांनी दमबाजी, शिवीगाळ केली. हा प्रकार सोमवारी (दि.२७) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. त्यानंतर घारगाव (ता. संगमनेर) पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच तक्रार देण्यासाठी तब्बल सहा तास थांबावे लागले. एवढे होऊनही घारगाव पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिस ठाण्यातच पोलिसाला आलेल्या अनुभवाची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

यांच्या विरोधात तक्रार – सचिन वैष्णव (गाव माहीत नाही), फॉरेस्ट अधिकारी (गाव, पत्ता माहीत नाही) व इतर दोघे अशा एकूण चार जणांविरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर (नेमणूक, पोलिस मुख्यालय, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

नेमकं काय घडलं – बाळेश्वर मंदिर परिसरात पोलिसांची बिनतारी यंत्रणा आहे. येथे पोलिस हेड कॉन्स्टेबल खेडकर ड्युटीला असताना सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बाहेर आरडाओरड सुरू होती. त्यामुळे त्यांनी बाहेर जावून पाहिले असता मंदिराच्या दरवाजाचे काम करणाऱ्या कामगारांना चौघे दमबाजी करत होते. ‘ते कामगार आहेत, त्यांना बोलू नका’ असे खेडकर त्यांना म्हणाले. त्यांनी वॉकीटॉकीद्वारे घारगाव पोलिसांची मदत मागितली.

मी पण पोलिस आहे… दमबाजी करणाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, ‘मी पण पोलिस आहे. तुम्ही जास्ती हुशारी करू नका, तुमचा खाली येऊन बोलण्याचा काही अधिकार नाही.’ त्यातील दुसऱ्याने ‘मी फॉरेस्ट अधिकारी आहे, या रूम आमच्या आहेत, तुम्ही मंदिरात झोपायचे, तुम्ही येथून चालते व्हा’ असे तो खेडकर यांना म्हणाला. इतर दोघे दमबाजी, शिवीगाळ करू लागले. ते चौघे ज्या चारचाकी वाहनातून आले होते, त्यात ’पोलिस’ नावाची इंग्रजी पाटी होती. त्या कारचा क्रमांक एम. एच. १७, सी. एक्स २३५६ असा आहे.

हातपाय, तोडण्याची धमकी… ‘तुम्ही खाली या, मी खाली कमानी जवळ राहत असून तुमचे हातपाय तोडतो’ अशी धमकी देऊन ते आलेल्या चारचाकी वाहनातून निघून गेले. त्यानंतर घारगाव पोलिस ठाण्यातील सरकारी वाहन घटनास्थळी आले. पोलिसांना घडला प्रकार खेडकर यांनी सांगितला. त्यानंतर ते घारगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मी रात्री ड्युटीसाठी मुक्कामी होतो. काही लोक रात्री येऊन ते मंदिराच्या दरवाजाचे काम करणाऱ्या कामगारांच्या खोलीत घुसले, त्यांनी तेथे नशापान केली.

सहा तास खोळंबल्यानंतर वरून सूत्रे फिरल्याने अदखलपात्र गुन्हा… घडलेल्या घटनेच्या संदर्भाने सकाळी ९ वाजता घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलो असता मला साधारण सहा तास पाेलीस ठाण्यात थांबून रहावे लागले. माझी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षकांना फोन केला. अहिल्यानगर येथे संपर्क करून विनंती केली. त्यानंतर पंधरा-वीस मिनिटांनी माझी फिर्याद घेतली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली. – रघुनाथ खेडकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,264
पोलीस रघुनाथ खेडकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.