Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » परिवहन विभागाच्या संमतीनंतर मुंबईत आता टॅक्सी बाईकला परवानगी
सामाजिक

परिवहन विभागाच्या संमतीनंतर मुंबईत आता टॅक्सी बाईकला परवानगी

प्राथमिक माहितीनुसार, बाईक टॅक्सीमध्ये प्रती किलोमीटर ३ रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. यामुळे बाईक टॅक्सी सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल, तसेच मुंबईकरांच्या पैशांचीदेखील बचत होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

महाराष्ट्रात प्रवास सुखकर होण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या काही काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता परिवहन विभागाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास स्वस्तात होणार आहे. ओला, उबेरसारखेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे. तसेच, पुढील दोन महिन्यात रॅपिडोसारख्या बाईक सर्विस सुरू होणार आहेत.

त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून पडणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी एक पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद आणि स्वस्तात होणार असल्याचे सांगितले जात आहे

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रवास करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई लोकल, बेस्ट बस, मुंबई मेट्रो, टॅक्सी, रिक्षा असे पर्याय असतानाही मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी मुंबईत बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असून, ही सेवा सुरू करून महिला प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

येत्या दोन महिन्यांत मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते म्हणाले की, “महिलांची सुरक्षा लक्षात घेता बाईक चालकाच्या मागे बसणाऱ्या महिला प्रवाशी यांच्यात अंतर असावे, तसेच बाईक चालक आणि महिला प्रवाशी यांच्यामध्ये विभाजक बसवणे बंधनकारक असणार आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले, ज्याप्रकारे पावसाळ्यामध्ये स्विगी किंवा इतर फूड डिलिव्हरी करणाऱ्या एजन्सीकडे एक फोल्डिंग असते. तशाच प्रकारे पावसाळ्यामध्ये प्रवासी किंवा चालकाला पाऊस लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, बाईक टॅक्सीमध्ये प्रती किलोमीटर ३ रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. यामुळे बाईक टॅक्सी सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल, तसेच मुंबईकरांच्या पैशांचीदेखील बचत होणार आहे.

राज्यातील परिवहन यंत्रणा अधिक सक्षम, सुसज्ज आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. वॉटर टॅक्सी, रोप वे, पार्किंग प्लाझा यांसारख्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 428
ई बाईक टॅक्सी परिवहन मंडळ प्रताप सरनाईक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.