Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती युवापिढीला दिशादर्शक – प्रा. राम शिंदे
सामाजिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती युवापिढीला दिशादर्शक – प्रा. राम शिंदे

विविध उपक्रमांद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य राज्यभरात पोहोचविणार - ॲड. आशिष शेलार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/01/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर दि. ३१- 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची तसेच त्यांच्या शौर्याची चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणारी माहिती युवापिढीला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये (दूरदृष्यप्रणालीद्वारे) गुरुवारी (३० जानेवारी) उद्घाटन करण्यात आले.

अहिल्यानगर पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सह संचालक राम पांडे, पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात समाजातील शोषित, पीडित व वंचितांना न्याय मिळवून देण्याबरोबरच अनेक धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार, जलसंवर्धन आणि समाजातील अपप्रवृत्तीला आळा घालण्याचे काम केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चौंडी विकासकामाच्या बृहत आराखड्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती राज्यातील युवा पिढीपर्यंत जावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारच्या चित्ररथाचे आयोजन करावे, असेही ते म्हणाले.

मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, धर्मपरायणता, दानशूरपणा व मानवतावाद हे गुण अंगी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान व कार्यक्षम राज्यकर्त्या होत्या. कृषीकर पद्धतीमध्ये सुधारणा, महिलांना विशेष हक्क, वस्त्रोद्योगास चालना व आर्थिक सुधारणा हे त्यांचे कार्य इतिहासात अजरामर झाले. बारव आणि घाटांची उभारणी, अन्नछत्र निर्मिती, मंदिरांचे जीर्णोद्धार आदी असंख्य समाजोपयोगी कार्यक्रम अहिल्यादेवींच्या जीवनकार्याचे वैशिष्ठ्य असल्याचेही ते म्हणाले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती जनमानासापर्यंत पोहोचवण्यासाठी चित्ररथाची निर्मिती करण्यात आली असल्याचे सांगत शेलार म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राज्यातील सहा विभागात दर्जेदार कार्यक्रम घेण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या गुणवर्णनाचा कार्यक्रम प्रत्येक जिल्हास्तरावर घेण्यात येणार आहे. त्यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच टपाल तिकिटाचे अनावरणही करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी होळकरांनी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी, घाट व बारव निर्माणसाठी, महिलांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य तसेच प्रशासनातील नेतृत्व व सामान्यांसाठी वेचलेल्या आयुष्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे.

रोजगाराभिमुख औद्योगिक धोरण, अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट रूढी बंद करणे, धर्मशाळांची उभारणी, करप्रणाली या विकासाच्या दिशा या त्यांच्या आयुष्यातल्या अग्रणी कर्तुत्वाचा भाग असल्याचेही मंत्री शेलार म्हणाले.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याची माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत चित्ररथाच्या माध्यमातून पोहोचविण्याऱ्या सुंदर अशा चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या जीवनात जलसंवर्धनाला अधिक महत्व दिले. त्यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने जिल्ह्यातील ३०० तलाव गाळमुक्त करण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सह संचालक राम पांडे यांनी चित्ररथाविषयी माहिती दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 397
अहिल्यादेवी होळकर चित्ररथ राम शिंदे सिद्धाराम सालिमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

By Annant Ppangarkar27/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक…

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026

मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या आजचे राशीभविष्य

27/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.