Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

त्यामुळे निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोधच्या दिशेने जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. थोरात-विखेंच्या एकीने बिनविरोध कडे जाणाऱ्या निवडणुकीवर आक्षेप घेणाऱ्या विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी आता कोणाची निवड केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
बँकेवर वर्चस्व असलेल्या थोरात-विखेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी एकत्र येत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये बैठकांचे सत्रही झडले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मात्र निवडणुकीत वेगळी भूमिका घेत निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. आता मात्र त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेत असल्याचे अखेरच्या क्षणी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोधच्या दिशेने जात आहे.
जिल्हा बँकेसाठी राज्याचे माजी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून रणजीतसिंह देशमुख, विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार गणपतराव सांगळे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला होता. या दोघांनीही सोमवारी बँक निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. देशमुख यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संगमनेर तालुका सहकारी दूध संघ (राजहंस) च्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता संगमनेरकरांना निर्माण झाली आहे. ज्येष्ठ लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हातात यासंबंधीचा निर्णय असल्याने या निर्णयाकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 433
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गणपतराव सांगळे निवडणूक रणजीतसिंह देशमुख राजीनामा राम शिंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.