Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उत्सवाच्या या दिवशी रात्री १२ पर्यंत बिनधास्त वाजवा ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक… जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
सामाजिक

उत्सवाच्या या दिवशी रात्री १२ पर्यंत बिनधास्त वाजवा ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक… जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

१९ फेब्रुवारी २०२५ शिवजयंती (तारखेनुसार शासकीय), १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २८ ऑगस्ट, १, २ व ६ सप्टेंबर गणपती उत्सव, ५ सप्टेंबर ईद-ए-मिलाद, २९ व ३० सप्टेंबर नवरात्र उत्सव, २१ ऑक्टोबर दीपावली, २५ डिसेंबर ख्रिसमस, ३१ डिसेंबर २०२५ व उर्वरित दोन दिवस शासनाने विहित केलेल्या अटीच्या अधिन राहून आवश्यकतेनुसार परवानगी देण्यात येईल.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 31, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर दि. ३१- 

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर श्रोतागृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज जिल्ह्याच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत सन २०२५ मधील पुढील नमूद १५ दिवसांसाठी ध्वनी प्रदुषणाची पातळी विहित मर्यादेत राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांच्या वापरास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आदेशाद्वारे परवानगी दिली आहे.

हे आहेत ते दिवस… १९ फेब्रुवारी २०२५ शिवजयंती (तारखेनुसार शासकीय), १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे महाराष्ट्र दिन, २८ ऑगस्ट, १, २ व ६ सप्टेंबर गणपती उत्सव, ५ सप्टेंबर ईद-ए-मिलाद, २९ व ३० सप्टेंबर नवरात्र उत्सव, २१ ऑक्टोबर दीपावली, २५ डिसेंबर ख्रिसमस, ३१ डिसेंबर २०२५ व उर्वरित दोन दिवस शासनाने विहित केलेल्या अटीच्या अधिन राहून आवश्यकतेनुसार परवानगी देण्यात येईल.

ही काळजी घ्यावी लागेल… उत्सव कालावधीमध्ये ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने निश्चित केलेल्या ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करावे. तसेच ध्वनी प्रदूषण नियम २००० अंतर्गत स्थापन केलेल्या प्राधिकरणाने त्यांच्याकडे प्राप्त तक्रारींवर उच्च न्यायालयाने १६ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या आदेशात विहित प‌द्धतीने कार्यवाही करावी.

पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शांतता क्षेत्राची माहिती घेऊन त्या भागातील ध्वनिमापक संयंत्रा‌द्वारे ध्वनिचे कंट्रोल नमुने घ्यावेत. त्याबाबत पंचनामा व ठाणे दैनंदिनीमध्ये नोंद घ्यावी. एखाद्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन आजुबाजुच्या लोकांना व सर्वसामान्यांना त्रास होत आहे अशी तक्रार आल्यास ती लिहून घ्यावी व स्टेशन डायरीला नोंद करुन त्या तक्रारीचा खरे-खोटेपणा पहाण्यासाठी घटनास्थळी जावे. घटनास्थळी गेल्यावर दोन पंचाच्या समक्ष ध्वनिची तीव्रता किती आहे याची नोंद घ्यावी. घटनास्थळाचे छायाचित्रण करावे. मोजलेली तीव्रता ही मानद मर्यादेपेक्षा अधिक असल्यास उचित प्राधिकरणाकडे पाठवून द्यावेत.

चौकशी कागदपत्रे पाठविण्याचे बंधन… घटनास्थळी जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या अहवालासोबत चौकशीचे सर्व कागदपत्रे त्वरित पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम २००० मधील तरतुदीप्रमाणे निर्माण करण्यात आलेल्या प्राधिकरणाकडे पाठवून द्यावेत. वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

आदर्श आचारसंहिताही पाळावी लागणार… तसेच निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आदर्श आचार संहितेचा नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 702
सिद्धाराम सालिमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

पेमगिरीच्या ‘हेरिटेज वॉक’मधून उलगडला ऐतिहासिक वैभव; शहागड आणि महाकाय वटवृक्षाला अभ्यासकांची भेट

June 8, 2026

गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात; गुंजाळवाडीत भक्ती अन् प्रबोधनाची महापर्वणी

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

By अनंत पांगारकरJune 13, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत,…

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026

आज शनिवार, १३ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 13, 2026

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.