अहिल्यानगर दि. १ –
जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहे. या रुग्णवाहिकांचे वाटप राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी (१ फेब्रुवारी) करण्यात आले.
यांची होती उपस्थिती… जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.
१९ रुग्णवाहिका… अहिल्यानगर जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत एकुण ११५ प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्यापैकी १०२ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई कार्यालयाकडून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिकाच्या जागेवर १४ व नवीन सुरू झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५ अशा एकूण १९ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. १ रुग्णवाहिकेची किंमत १७ लक्ष ९५ हजार असून १९ रुग्णवाहिकांसाठी एकुण ३ कोटी ४१ लक्ष ५ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
येथील आरोग्य केंद्रांना मिळाल्या रुग्णवाहिका… रुईछत्तीशी (ता. नगर), लाडगांव (ता. अकोले), खर्डा (ता. जामखेड), शिऊर (ता. जामखेड), सोनेगांव (ता. जामखेड), संवस्तर (ता. कोपरगांव), वारी (ता. कोपरगांव), वाकडी (ता. राहता), अस्तगांव (ता. राहता), डोऱ्हाळे (ता. राहता), सावळीविहीर (ता. राहता), तिसगांव (ता. पाथर्डी), भातकुडगांव (ता. शेवगांव), दहिगांव (ता. शेवगांव), आढळगांव (ता. श्रीगोंदा), काष्टी (ता. श्रीगोंदा), म्हैसगांव (ता. राहुरी) जोर्वे (ता. संगमनेर) आणि कोंभळी (ता. कर्जत) या प्राथमिक आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिका देण्यात आल्या.




