मेधा महोत्सवाचा शानदार उद्घाटन समारंभ, चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश आयुष्यभर अपमान करते : लेखक शरद तांदळे
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या बाहेर पडून विद्यार्थ्यांनी वाचनावर भर दिला पाहिजे. जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. जीवनाचा मार्ग तुम्हाला वाचनातून सापडेल.


संगमनेर दि. २ फेब्रुवारी –
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर विश्वस्त डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, ॲड. आर. बी.सोनवणे, लक्ष्मणराव कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मेधाचे समन्वयक प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश उपस्थित होते.
तांदळे म्हणाले, जीवनामध्ये नम्रता अत्यंत गरजेची असून नम्रतेने जग जिंकता येते. याचबरोबर वाचनही अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या बाहेर पडून विद्यार्थ्यांनी वाचनावर भर दिला पाहिजे. जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. जीवनाचा मार्ग तुम्हाला वाचनातून सापडेल. कर्तुत्वान होण्यासाठी परिश्रमांची गरज आहे. कपड्यांनी मोठे होण्यापेक्षा कर्तुत्वाने मोठे व्हा. आपले स्वप्न नेमके काय आहे ते स्वतःला विचारा. आवडत्या क्षेत्रासाठी वेळ द्या. विचार आणि चिंतन हे अत्यंत महत्त्वाचे असून चांगले वाचा, चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात रहा. आगामी काळात ए आयचे युग येणार असून आपले मनगट आपल्या हातात ठेवा यश नक्की मिळेल.
यावेळी बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, सर्व देशमुख यांची भाषण झाली.
स्वच्छता व हिरवाईने नटलेला ऑक्सीजन हब परिसर… ग्रामीण भागात असलेली अमृतवाहिनी ही संस्था गुणवत्तेने मोठी आहेच. परंतु येथील शिस्तप्रिय वातावरण, स्वच्छता आणि या परिसरात असलेली सुमारे ५० हजार झाडे यामुळे हा हिरवाईचा परिसर ऑक्सिजन हब असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारा असल्याचे गौरवोद्गार लेखक शरद तांदळे यांनी काढले.
