Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नाशिक-पुणे महामार्गावर होणार ३९,५०० वृक्ष लागवड, वन्यजीवा संदर्भातील सर्व कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश
सामाजिक

नाशिक-पुणे महामार्गावर होणार ३९,५०० वृक्ष लागवड, वन्यजीवा संदर्भातील सर्व कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश

याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/02/2025Updated:03/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. ३ फेब्रुवारी :  

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तोडलेली झाडे, वन्यजीव यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हा्वेस्टिंग ही कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करावे व त्यानंतर ४ महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करावे असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले आहेत. या मार्गावर ३९,५०० वृक्षांची लागवड होणार असून त्याचे पाच वर्षांसाठी संगोपन देखील ठेकेदार करणार आहे.

याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २०१४ साली उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांनी पुणे-नाशिक रस्त्याच्या चौपदरीकरणात अडथळा ठरणारी २३७३ झाडे तोडण्याची व त्या झाडांच्या बदल्यात १० पट झाडे लावण्याची अट घालत परवानगी दिली होती. त्या परवानगीनुसार २०२० पर्यंत कोणतीही कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून झाली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी याबाबत जुलै २०२० मध्ये पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणमध्ये याचिका दाखल केली होती.

याचिकेत पहिल्यांदा संगमनेर तालुक्यात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात १० पट झाडे लावली नाही म्हणून कामकाज सुरू झाले होते . नंतर या रस्त्याशी संबधित पर्यावरण मंजुरीतले मुद्दे घेऊन हा रस्ता ज्या-ज्या जिल्ह्यातून जातो त्या पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील तोडलेली झाडे, वन्यजीव यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग, ओव्हर पास, पावसाचे पडणाऱ्या पाण्यासाठी रेन वॉटर हा्वेस्टिंग या मुद्द्यांवर सुनावणी झाली.‌ त्यात ही कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे व त्यानंतर ४ महिन्यात ती कामे पूर्ण झाली की नाहीत याची पडताळणी करून संयुक्त समितीने अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांनी दिलेले आहेत.

यामुळे राजगुरूनगर, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर या तालुक्यातून जाणाऱ्या खेड-सिन्नर (पूर्वीचा पुणे-नाशिक ) महामार्गाच्या दुतर्फा कडू नीम, वड, कंचन, पिंपळ, करंज या देशी जातीच्या ३९ हजार ५०० वृक्षांची लागवड होणार असून पुढील ५ वर्षे संगोपन करण्याची जबाबदारीही संबंधित ठेकेदाराची असणार आहे.

वन्यजीव संस्था, वन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीत वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी व उड्डाण पुल याबाबत केलेल्या संयुक्त पाहणी अहवालाचा आधार घेऊन माळवाडी येथे भुयारी मार्ग, खंदरमाळवाडी व कऱ्हे घाट येथे उड्डाणपूल तर वेल्हाळे, चंदनापुरी (जावळे वस्ती), डोळासणे येथे असलेल्या भुयारी मार्गात योग्य ते साऊंड आणि लाईट बसविण्याचे सुचवले होते. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.

पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा निर्माण करण्याचेही आदेशात म्हटले आहे. सदर याचिकेत ॲड. ऋत्विक दत्ता, राहुल चौधरी, इतिशा यांनी काम पाहिले तर पर्यावरण तज्ञ सारंग यादवाडकर यांनी मार्गदर्शन केले.

🔴 वन्य जीवांबाबत वन खाते उदासीन… या याचिकेत वन्यजीवांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी किंवा उड्डाण पुल निर्माण करावेत हा मुद्दा उपस्थित केलेला असतानाही वन विभाग याबाबत फार गंभीर नसल्याचे दिसून आले. पुणे व अहिल्यानगर येथील कामासाठी पर्यावरण मंजुरी देताना ही अट घातलेली असताना या दोन्ही जिल्यातील वन अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केले. पूर्वी महसूल व वन विभाग वृक्षतोड करण्यास परवानगी द्यायचा आणि आता वन विभागाकडून देण्यात येते पण त्यात टाकलेल्या अटी शर्ती याचे पालन होते की, नाही याकडे लक्ष दिले जात नाही. – गणेश बोऱ्हाडे, सामाजिक कार्यकर्ते, संगमनेर.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,071
गणेश बोऱ्हाडे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar28/09/20260

आजचे राशिभविष्य  मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या…

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथे टोमॅटो तोडण्याच्या वादातून हाणामारी, विनयभंग; १२ जणांवर गुन्हा दाखल

27/09/2026

रविवार विशेष लेख— साहिलचा मृत्यू; शिक्षणाच्या मंदिरातील प्रश्न आता टाळता येणार नाहीत!

27/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.