Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी १ कोटीच्या निधीची पालकमंत्री विखे पाटलांची घोषणा खोटी ठरली, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असा निधी देता येत नाही – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
पत्रकारिता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी १ कोटीच्या निधीची पालकमंत्री विखे पाटलांची घोषणा खोटी ठरली, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असा निधी देता येत नाही – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

निधीसाठी आमदार सत्यजित तांबे यांचा पाठपुरावा तर विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भूमिकेकडे लक्ष!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/02/2025Updated:07/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर

संगमनेर दि. ०४ फेब्रुवारी –

संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी तत्कालीन व विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ एक कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा खोटी ठरली आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या संबंधीचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे ही बाब उघड झाली.

तांबे यांनी बैठकीत घोषणा केल्याप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने एक कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी तांबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असा निधी देता येत नाही त्यावर काय उपाय करता येईल याबाबत आम्ही सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तत्कालीन शहर प्रमुख अमर कतारी यांनी नगर परिषदेकडे केली होती. यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने एक लाख रुपये तर शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते.

कतारी यांनी पालिकेकडे केलेल्या मागणीनंतर तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. नगर परिषदेच्या माध्यमातून हा पुतळा उभारला जाणार होता यासाठी तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात व तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेने यासाठीचा ठराव ३ जून २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता.

नगर परिषदेच्यावतीने यासाठी निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी यासाठी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २१ ऑगस्ट २०२३ रोजी संगमनेर बस स्थानकावरील एसटी महामंडळाची जागा नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासंबंधीच्या सूचना परिवहन मंडळाला दिल्या होत्या.

दरम्यान तांबे यांचा पाठपुरावा सुरू असतानाच तत्कालीन महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १६ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपये देण्याचे घोषणा केली होती. पालकमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेत एक कोटी रुपयांची घोषणा केल्याने पालिकेचा प्रस्ताव मागे पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपये आणि पुतळ्यासाठीची जागा निश्चित झाल्याने संगमनेरकर आनंदित झाले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या प्रमुखपदी अमोल खताळ यांची नियुक्ती केली होती.

पालकमंत्र्यांच्या पहिल्याच बैठकीत तांबे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित करत निधीची मागणी केल्यानंतर अशा प्रकारचा निधी मिळू शकत नसल्याची बाब समोर आल्याने आमदार तांबे यांनी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. तर समितीचे प्रमुख असलेले खताळ देखील आता आमदार असल्याने त्यांच्यासह पालकमंत्री विखे पाटील या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 17,718
अमर कतारी अमोल खताळ छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा दुर्गाताई तांबे निधी बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे सत्यजित तांबे सिद्धराम सालीमठ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.