Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक, संजय सेठी नवे अध्यक्ष; मुख्यमंत्री फडणवीसांचा सरनाईकांना धक्का
राजकारण

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक, संजय सेठी नवे अध्यक्ष; मुख्यमंत्री फडणवीसांचा सरनाईकांना धक्का

गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांच्यात विभागाने संजय सेठी यांची नियुक्ती केल्यामुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू असताना भाजपने बुधवारी १७ जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा संपर्क मंत्री नियुक्त केल्याचे भाजपने म्हटले असले, तरी ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्क मंत्री देऊन पक्षाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे बोलले जाते.

अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. गृह विभागाने राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय सेठी या आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. यापूर्वी एसटीची सारी जबाबदारी ही परिवहन मंत्र्यांकडे दिली जायची. मात्र नव्या नियुक्तीने परिवहन मंत्री सरनाईक यांचे अधिकार काढून घेतल्याची चर्चा सुरु झाली.

राज्यात २०१४ साली युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे अध्यक्षपद शिवसेनेकडे होते. २०१४ ते २०१९ या काळात एसटी महामंडळाचे अध्यक्षपद शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याकडे होते. यानंतर २०१९ मध्ये मविआ सरकारच्या काळात शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. यावेळी शिंदे सरकारच्या काळात नियमामध्ये बदल करून एसटीचे अध्यक्षपद भरत गोगावले यांना देण्यात आले होते.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सप्टेंबर २०२४ मध्ये भरत गोगावले यांना बळ देण्यासाठी आणि मंत्रिपदापासून वंचित राहिल्याने असलेली नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन शिंदे सरकारने एसटी महामंडळाचे अध्यक्ष त्यांना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे बहुमताने सरकार आल्यानंतर भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी विभागाचे मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणीही नाही.

परिवहन मंत्री या नात्याने शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे सध्या एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषवत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रताप सरनाईक यांनी नुकताच कर्नाटक राज्याचा दौराही केला होता. अलीकडेच प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एसटी महामंडळात नवीन अध्यक्षाची त्वरित नियुक्ती करण्याची विनंती केली होती. २०१४ ते २०१९ या काळात परिवहन मंत्र्यांकडेच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद आपल्याकडे येईल, अशी अपेक्षा प्रताप सरनाईक यांना होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी प्रताप सरनाईकांना धक्का देत एसटीच्या अध्यक्षपदी आयएएस आधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.

सरकारने आज एक राजपत्र जारी करून अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी असलेले परिवहन सचिव संजय सेठी यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भात आज गृहविभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांच्यात विभागाने संजय सेठी यांची नियुक्ती केल्यामुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 672
एकनाथ शिंदे एसटी महामंडळ देवेंद्र फडणवीस प्रताप सरनाईक संजय सेठी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.