रविवार, दि. ९ फेब्रुवारी –
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तळीरामाला पुण्याच्या शिवाजीनगर मोटर वाहन न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
३ ऑगस्ट २०२४ रोजी कोथरुड वाहतूक विभागाने रब्बीन रमजान शेख (वय २९, रा. जनवाडी, पुणे) याच्या विरोधात दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यान्वये खटला दाखल केला होता. बुधवारी (५ फेब्रुवारी) या खटल्याचा शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयातील न्यायाधीश बिराजदार यांनी निवाडा केला. न्यायालयाने शेख याला ५ दिवसांची साधी कैद आणि २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.





