Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजकीय हेतूने काम बंद ठेवल्याचा आरोप… चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करा अन्यथा करणार आत्मदहन : सरपंच भाऊराव राहणे
राजकारण

राजकीय हेतूने काम बंद ठेवल्याचा आरोप… चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करा अन्यथा करणार आत्मदहन : सरपंच भाऊराव राहणे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध गावांसाठी असलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांसाठी सुमारे ८०० कोटींचा निधी मंजूर करून घेतला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, दि. ०९ फेब्रुवारी –
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा करून संगमनेर तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनेकरिता सुमारे ८०० कोटी रुपये निधी मंजूर करून काम सुरू केले. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय हेतू ठेवून अनेक कामे बंद पडली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असून चंदनापुरी, झोळे व हिवरगाव पावसा जलजीवन योजनेतील पाणीपुरवठा योजनेचे बंद असलेले काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सरपंच भाऊराव राहणे यांनी केली असून तातडीने काम न सुरू झाल्यास आत्मदहनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
याबाबत चंदनापुरीचे सरपंच भाऊराव राहणे, यांनी ज्येष्ठ नेते आर. बी. राहणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले.
यावेळी त्यांच्यासमवेत उपसरपंच हौसाबाई कढने, लक्ष्मी राहणे, मंगल वाकचौरे, सुरेखा काळे, शंकरराव रहाणे, सीमाताई भालेराव, गोरख सातपुते, किरण राहणे, राजेंद्र भालेराव, विद्याताई राहणे, रंगनाथ खर्डे, हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख, झोळेचे माधव वाळे, दत्तू गोफने आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध गावांसाठी असलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांसाठी सुमारे ८०० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या अंतर्गत चंदनापुरी, झोळे व हिवरगाव पावसा ही तीन गावे आदर्श ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमधून जोडली जाणार आहेत. काही लोकांनी राजकीय हेतू ठेवून ही कामे बंद ठेवली आहे.
याचबरोबर झोळे येथील साठवण तलावाचे काम जवळजवळ वीस दिवसांपासून बंद आहे. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासनाने कुठलीही ठोस पावले उचललेली नाही. प्रशासनाकडून होणाऱ्या या हलगर्जीपणाबाबत नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला जाब विचारला आहे. मात्र तरीही राजकीय उद्देश ठेवून हे काम बंद पाडले आहे.
त्यामुळे शुक्रवारपर्यंत (१४ फेब्रुवारी) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने हे काम सुरू न केल्यास आत्मदहन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील, असा खणखणीत इशारा चंदनापुरी, झोळे व हिवरगाव पावसा आदर्श ग्राम पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष तथा चंदनापुरीचे सरपंच भाऊराव रहाणे यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, उपविभागीय कार्यालय, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय यांनाही निवेदन दिले आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 958
आत्मदहन इशारा भाऊराव रहाणे हिवरगाव पावसा जलजीवन योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.