Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार, १२ ऑक्टोंबर जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

12/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तिळगुळाच्या नावाखाली महिलांच्या कार्यक्रमात पुरुषांचा धांगडधिंगा ही संगमनेरची संस्कृती नाही, लोकप्रतिनिधीच्या डान्सबद्दल तालुक्यात तीव्र नाराजी; तिळगुळाच्या नावाखाली संगमनेरमधील महिलांचा अपमान
सामाजिक

तिळगुळाच्या नावाखाली महिलांच्या कार्यक्रमात पुरुषांचा धांगडधिंगा ही संगमनेरची संस्कृती नाही, लोकप्रतिनिधीच्या डान्सबद्दल तालुक्यात तीव्र नाराजी; तिळगुळाच्या नावाखाली संगमनेरमधील महिलांचा अपमान

ही महाराष्ट्राची संस्कृती नसून याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व पुरोगामी महिला संघटना या रस्त्यावर उतरून निषेध करणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १० फेब्रुवारी –

तिळगुळ देणे हा सण भारतीय परंपरेत पवित्र मानला जातो. मात्र तिळगुळ या समारंभाच्या नावाखाली महिलांना एकत्र करून तमाम महिला भगिनीसमोर लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या गाण्यांवर केलेला डान्स आणि धांगडधिंगा घालून संगमनेरमधील महिला भगिनींचा अपमान करणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. संगमनेर तालुक्यात अशी असभ्य संस्कृती मान्य नसल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे.

शहरातील जाणता राजा मैदानावर तिळगुळ या कार्यक्रमाच्या नावाखाली महिलांना एकत्र करण्यात आले. अत्यंत गोंधळ झालेल्या या कार्यक्रमात महिलांची कोणतीही सुविधा नव्हती. फक्त राजकीय उद्देशाने सर्व महिलांना एकत्र केले होते. बक्षिसाच्या नावाखाली महिला भगिनींना लाच देण्याचा प्रकार काहीसा यामधून दिसत होता. बेशिस्त आणि अत्यंत चुकीच्या झालेल्या या कार्यक्रमात आयोजकांनी असभ्य संस्कृती दाखवली.

यावर सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे महिलांच्या खेळ पैठणीच्या या ऐवजी तमाम महिला भगिनी समोर आणि निमंत्रक असलेल्या संगमनेरच्या लोकप्रतिनिधी समोर उपस्थित माजी खासदाराने केलेला डान्स हा अत्यंत चुकीचा आणि असभ्य पद्धतीचा व महिलांचा अपमान करणारा होता. हजारो माय भगिनींचा सन्मान करण्याऐवजी त्यांच्यासमोर धांगडधिंगा घालणाऱ्या गाण्यांवर डान्स करणे ही कुठली संस्कृती आहे, असा प्रश्न संगमनेरमधील महिला मंडळांनी विचारला आहे.

संगमनेर हे सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर आहे. राजकारण हे सर्वांना सोबत घेऊन केले जाते. राजकारणात सुद्धा महिलांचा सन्मान केला पाहिजे. मात्र व्यक्तीद्वेष ठेवून काही लोक राजकारणाची पेरणी येथे करू लागले असून ते तमाम महिला भगिनींचा अपमान करत आहे.

‘मै हु डॉन’ आणि ‘झिंगाट’ या गाण्यावर नाचणे हा पराक्रम नव्हे तर महिलांचा अपमान आहे. अशा गाण्यांवर नाचायचेच होते तर डीजे लावून मुलांमध्ये का नाचले नाही. वरातीमध्ये का नाचले नाही. महिलांना एकत्र बोलवायचे आणि देवीचे व लक्ष्मीचे रूप असलेल्या ज्येष्ठ महिला आणि माता भगिनींसमोर वाकडेतिकडे चाळे करायचे हा अत्यंत निंदनीय व असभ्य प्रकार आहे. त्यामुळे या गोंधळ घालणाऱ्या आणि त्यानंतर झालेल्या नृत्याचा आणि कार्यक्रमाचा संगमनेर तालुक्यामध्ये तीव्र निषेध होत असून असे चुकीचे प्रकार संगमनेर तालुक्यात खपून घेतले जाणार नाही. असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या वनिता सोनवणे, सायली दिघे, रूपाली गुंजाळ, मोहिनी भालेराव, कविता आंधळे, मयुरी अट्टल, माधुरी जोशी, सुनिता कुलकर्णी, मनीषा कोल्हे या महिलांनी दिला आहे.

असभ्यपणाचा कळस… सुसंस्कृत संगमनेर ही राज्याला ओळख आहे. येथे नेहमी महिलांचा मान सन्मान केला जातो. मात्र तिळगुळाच्या नावाखाली महिलांना एकत्र करून त्यांच्यासमोर विचित्र गाण्यांवर डान्स करणे ही असभ्य संस्कृती संगमनेर तालुक्यातील महिला युवक आणि नागरिक कधीही सहन करणार नाही आणि ही असत्य संस्कृती पुरोगामी महाराष्ट्रात कधीही टिकणार नाही . अरे कुठे घेऊन चालले तुम्ही सुसंस्कृत संगमनेर अशा असभ्य संस्कृतीकडे का? असा कळकळीचा प्रश्न युवक कार्यकर्ती प्राजक्ता मिसाळ यांनी विचारला असून झालेला कार्यक्रम हा असभ्यपणाचा कळस असल्याचे त्यांनी म्हटले आहे

पुरोगामी महिला संघटना रस्त्यावर उतरणार… तिळगुळाच्या नावाखाली राजकीय उद्देश ठेवून महिलांना एकत्र करणे आणि तमाम महिला भगिनींचा अपमान करत त्यांच्यासमोर विचित्र गाण्यांवर डान्स करणे. ही महाराष्ट्राची संस्कृती नसून याचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील सर्व पुरोगामी महिला संघटना या रस्त्यावर उतरून निषेध करणार आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,352
तिळगुळ निषेध हळदी कुंकू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार, १२ ऑक्टोंबर जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

By Annant Ppangarkar12/10/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि लाभदायक राहील. कुटुंबाची साथ लाभेल आणि…

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.