Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यात या एका पराभूत उमेदवाराच्या अर्जानुसार होणार मतदान यंत्राची पडताळणी
निवडणूक

अहिल्यानगर जिल्ह्यात या एका पराभूत उमेदवाराच्या अर्जानुसार होणार मतदान यंत्राची पडताळणी

पराभूत झालेल्या उमेदवारांपैकी बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, प्रभावती घोगरे, अभिषेक कळमकर, राहूल जगताप व संदीप वर्पे यांनी पडताळणीच्या प्रक्रियेतून माघार घेतली आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. ११ फेब्रुवारी –

मतदान यंत्र पडताळणी प्रक्रियेत केवळ नेवासा मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) पराभूत उमेदवार शंकरराव गडाख यांचाच अर्ज राहिल्याने गडाख यांच्या अर्जानुसार मतदान यंत्राची पडताळणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील एक व विधानसभा निवडणुकीतील १० अशा एकूण ११ पराभूत उमेदवारांनी निवडणुकीतील मतदान यंत्र पडताळणीसाठी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात मात्र आता केवळ एकच उमेदवार पडताळणीच्या रिंगणात राहिला आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अहिल्यानगर मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी तसेच विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात (काँग्रेस, संगमनेर), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी-शरद पवार), प्रभावती घोगरे (काँग्रेस, शिर्डी), अभिषेक कळमकर (अहिल्यानगर, राष्ट्रवादी-शरद पवार), संदीप वर्पे (राष्ट्रवादी-शरद पवार, कोपरगाव), राम शिंदे (भाजप, कर्जत-जामखेड), प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी-शरद पवार), राणी नीलेश लंके (पारनेर, राष्ट्रवादी-शरद पवार) राहुल जगताप (श्रीगोंदे- राष्ट्रवादी-शरद पवार) व शंकरराव गडाख (शिवसेना-ठाकरे) या १० जणांनी मतदान यंत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केले होते.

मात्र यातील सुजय विखे, राम शिंदे, राणी लंके व प्रताप ढाकणे या चौघांनी निवडणूक निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयातही याचिका दाखल केलेली आहे. निवडणूक आयोगाने याचिका दाखल असणाऱ्यांची, पडताळणीची मागणी न्यायालयाच्या परवानगी नंतरच केली जाईल, त्यासाठी त्यांनी न्यायालयाची परवानगी आणावी, असे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे या चौघांच्या मागणीनुसार होणारी पडताळणी आता न्यायालयाच्या परवानगी नंतरच होईल. यामुळे केवळ गडाख यांचा एकमेव अर्ज पडताळणीसाठी शिल्लक राहिला आहे.

गडाख यांनी नेवासा मतदारसंघातील सोनई, धनगरवाडी, मोरेचिंचोली, बुऱ्हाणपूर, सांगवी व माका या सहा केंद्रांवरील १० मतदान यंत्र पडताळणीची मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार ही पडताळणी २१, २२ व २४ फेब्रुवारीला अहिल्यानगर शहराजवळील एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात केली जाणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली.

इतर पराभूत झालेल्या उमेदवारांपैकी बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, प्रभावती घोगरे, अभिषेक कळमकर, राहूल जगताप व संदीप वर्पे यांनी पडताळणीच्या प्रक्रियेतून माघार घेतली आहे. मतदान यंत्र पडताळणीसाठी प्रति यंत्र ४७ हजार २०० रु. (जीएसटीसह) शुल्क या पराभूत उमेदवारांनी जमा केले होते. त्यांनी पडताळणीसाठी भरलेले शुल्कही त्यांना परत मिळणार आहे.

मतदान यंत्र पडताळणीची मागणी करणाऱ्यांना अजूनही आपली मागणी रद्द करता येणार आहे. ज्या दिवशी पडताळणी केली जाईल, त्याच्या तीन दिवस आधी ही माघार घेता येणार आहे. शिवाय त्यांनी भरलेले शुल्कही परत केले जाणार आहे. – राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक शाखा, अहिल्यानगर.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,404
ईव्हीएम पडताळणी निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे एस.टी. पास शुल्क पूर्णपणे माफ करा; आमदार अमोल खताळ यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

By Annant Ppangarkar06/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दुष्काळाच्या तीव्र संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती…

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

संगमनेरमधील भावी पोलीस योद्ध्यांसाठी ‘मिशन खाकी’ ठरतेय आधार; प्रशिक्षण केंद्रांमध्ये जनजागृती मोहीम सुरू

06/10/2026

ज्ञानेशकुमार हे भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे हत्यार; एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची माजी मंत्री थोरात यांची जोरदार मागणी

06/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.