Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्क्यावर धक्के… एकनाथ शिंदेंच्या ३ लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री फडणवीसांचा ब्रेक?
राजकारण

धक्क्यावर धक्के… एकनाथ शिंदेंच्या ३ लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री फडणवीसांचा ब्रेक?

लाडक्या बहिणींना द्यावयाच्या प्रत्येकी दीड हजार रुपयांनी सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडल्याने आता हा ताण कमी करण्यासाठी 'आनंदाचा शिधा', 'शिवभोजन थाळी' आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना थांबविण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी –

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्क्यावर धक्के दिले जात आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातील लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याची माहिती समोर आली आहे.

लाडक्या बहिणींना द्यावयाच्या प्रत्येकी दीड हजार रुपयांनी सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडल्याने आता हा ताण कमी करण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’, ‘शिवभोजन थाळी’ आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना थांबविण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदी असताना एकनाथ शिंदेंनी तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांना प्रमुख स्थळांचे तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. ‘आनंदाचा शिधा’ही योजना देखील थांबवण्याचा फडणवीस सरकारचा विचार करत आहे. तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्यानं मोफत योजना थांबवण्याचा विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ‘शिवभोजन थाळी’ योजनाही बंद करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.

एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनावरुनही वगळले – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनावरुनही वगळण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आहे. मात्र नगरविकास मंत्री असून एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळले आहे. महसूल,मदत पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्री समितीवर आहेत. मुंबईतल्या जुलै २००५ च्या महापुरानंतर आपत्ती व्यवस्थापनाची स्थापना करण्यात आली होती.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,040
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस महायुती सरकार योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.