Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य… राहुल सोलापूरकरांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, सोलापूरकरांच्या घराबाहेर आरपीआय वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य… राहुल सोलापूरकरांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, सोलापूरकरांच्या घराबाहेर आरपीआय वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

सरकारने अशा विकृत व्यक्तीला पाठीशी घालू नये, अन्यथा येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी 

सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे सोलापूरकरांविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी वंचित बहुजन आघाडी आणि आरपीआयने सोलापूरकर यांच्या घरासमोर आंदोलन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील घराबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते.

सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मात्र शिवाजी महाराजांबद्दल आक्षपार्ह वक्तव्य प्रकरण कुठे थांबत नाही तोच आता पुन्हा सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि आरपीआयने आंदोलन केले आहे.

महापुरुषांबद्दल सातत्याने गरळ रोखणाऱ्या सिने अभिनेता राहुल सोलापूरकरबद्दल राज्यातील जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूरकर यांच्या विरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत असून वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोलापूरकर यांच्या विरोधात आता लोक रस्त्यावर उतरू लागले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांना राज्य सरकारकडून पोलीस बंदोबस्त दिला जातो ही बाब निषेधार्य असून त्या विकृत व्यक्तीच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्याला अटक करण्यात यावे अशी मागणी आहे. सरकारने अशा विकृत व्यक्तीला पाठीशी घालू नये, अन्यथा येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. – परशुराम वाडेकर, आरपीआय नेते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 522
आरपीआय राहुल सोलापूरकर वंचित बहुजन आघाडी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात संगमनेर पेटले! संतप्त शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयात घुसले आमदारांचे फ्लेक्स लावायला तुम्ही त्यांचे गुलाम आहात का? – माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा थेट सवाल यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन; अखेर प्रांताधिकारी अरुण उंडे नमले, निवेदन स्वीकारले

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.