Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कायद्याची भीती नसलेल्या वाळूतस्करांचे धाडस वाढले… थेट महसूलच्या पथकावरच घातला जेसीबी, गुन्हा दाखल करून प्रशासन शांत बसणार की तस्करांना लगाम घालणार
गुन्हेगारी

कायद्याची भीती नसलेल्या वाळूतस्करांचे धाडस वाढले… थेट महसूलच्या पथकावरच घातला जेसीबी, गुन्हा दाखल करून प्रशासन शांत बसणार की तस्करांना लगाम घालणार

संगमनेर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी महसूल विभागाने भरारी पथके नेमली आहे. या पथकांच्या माध्यमातून अवैध वाळू तस्करांवर कठोरात कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. - धीरज मांजरे तहसीलदार, संगमनेर.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी –
तत्कालीन महसूलमंत्र्यांचे सातत्याने फसलेले वाळू धोरण महसूल विभागाच्या जीवावर बेतले आहे. गेल्या काही वर्षातील एकही महसूल मंत्री अथवा महसूल प्रशासन या वाळू तस्करांचा माज उतरवू शकलेले नाही.
राजकीय पक्ष नेत्यांच्या वरदहस्ताने संगमनेर तालुक्यातील सर्व नद्यांचे वाळूच्या रुपाने लचके तोडण्याचे काम तस्करांकडून सुरू आहे. अशाच एका अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची रविवारी मध्यरात्री वक्रदृष्टी पडली होती. महसूल विभागाच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने संगमनेर तालुक्यातील कनोली येथे प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू तस्करीवर कारवाईचा प्रयत्न केला.
मात्र संतापलेल्या वाळूतस्करांनी थेट या पथकाच्या अंगावरच जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला, प्रसंगावधान राखत पथकातील अधिकारी कर्मचारी बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी तस्करांकडून हल्ल्याचे संकट मात्र कायम आहे. कामगार तलाठी संतोष बाबासाहेब शेलार हे पथकासह नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेले होते.
कनोली येथे थेट जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईचा बडगा उगारताच जेसीबी चालक त्याच्या ताब्यातील जेसीबी घेऊन पळून जाऊ लागला.
पथकाने त्याचा पाठलाग केला असता सावळीराम लहानु खेमनर, तुषार हौशीराम खेमनर, विशाल हौशीराम खेमनर, सागर जगताप, लखन उर्फ दीपक मदने आणि अन्य दोघा ठिकाणी दुचाकी आणि कार जेसीबीच्या मागे पुढे ठेवून पथकाला कारवाईस अडथळा आणला.
पथकाने पुढे जात अंभोरे गावच्या पुढे जेसीबी थांबविला असता वरील आरोपींसह विशाल आबाजी खेमनर, प्रवीण शिवाजी गवारी, फिरोज शेख व ताहीर शेख यांनी आणखी काही जणांना जमा करत सरकारी कामात अडथळा आणत आमच्यावर जर कारवाई केली तर तुमच्या हात पाय तोडू व याचे जिवंत मारून टाकू असे धमकी दिली. यावेळी जेसीबी चालक सोनू मोरे याने पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर जेसीबी घातला मात्र प्रसंगावधान राखल्याने पथकातील कर्मचारी वाचले.
यासंदर्भात कामगार तलाठी संतोष शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात वरील आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

कठोर कारवाई करणार…
संगमनेर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी महसूल विभागाने भरारी पथके नेमली आहे. या पथकांच्या माध्यमातून अवैध वाळू तस्करांवर कठोरात कठोर कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. – धीरज मांजरे तहसीलदार, संगमनेर.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,006
कारवाई धीरज मांजरे पथकावर हल्ला वाळू तस्करी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar10/09/20260

annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.