Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वाळू तस्करांनी महसूलच्या पथकावर केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी अहिल्यानगर एलसीबीने पकडले दोन मुख्य आरोपी, संगमनेर शहरात एलसीबीची कारवाई
गुन्हेगारी

वाळू तस्करांनी महसूलच्या पथकावर केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी अहिल्यानगर एलसीबीने पकडले दोन मुख्य आरोपी, संगमनेर शहरात एलसीबीची कारवाई

या गुन्ह्यातील आरोपी विशाल हौशीराम खेमनर हा त्याच्या साथीदारांसह संगमनेरमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर, दि. १२ फेब्रुवारी –

संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूलच्या पथकावर झालेल्या हल्ला प्रकरणातील दोघा मुख्य आरोपींना पकडण्यात आहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींना पकडून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

विशाल हौशीराम खेमनर (वय ३३, रा. अंभोरे, ता. संगमनेर) व सागर गोरक्षनाथ जगताप (रा. कनोली, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी पकडलेल्या दोघा आरोपींची नावे आहे. हे दोघेही प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जाते.

तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाचे रात्रगस्तीपथक रविवारी रात्री प्रवरा नदीपात्रात कनोली येथे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. येथे पथकाला जेसीबीच्या सहाय्याने वाळू उत्खनन केले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने जेसीबी तसेच विशाल आबाजी खेमनर आणि प्रवीण शिवाजी गवारी या दोघा उत्खनन करणाऱ्यांना ताब्यात घेत संगमनेरला आणत असताना त्यांचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी घेऊन पळून जाऊ लागले.

त्यामुळे पथकाने त्यांचा पाठलाग केला असता जेसीबी चालकाने पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर जेसीबी घातला. सुदैवाने पथकातील कर्मचारी यातून बचावले असले तरी आरोपीच्या अन्य पाच-सहा साथीदारांनी महसूल पथकाला रस्त्यात आढळून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांचे ताब्यातील जेसीबी घेऊन पळून गेले.

या संदर्भात कामगार तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९, १३२, १८९(२), १९१(२), ३०३(२), ३५२, ३५१(२)(३), ३५१(४), २२१ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्कराकडून झालेल्या हल्ल्याची प्राथमिक माहिती मिळताच अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस आमदार मनोहर गोसावी, संदीप दरंदले, सागर ससाने, अमृत आढाव, फुरखान शेख, मेघराज कोल्हे व महादेव भांड यांचे पथक आरोपींच्या मागावर होते.

या गुन्ह्यातील आरोपी विशाल हौशीराम खेमनर हा त्याच्या साथीदारांसह संगमनेरमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. पथकाने शहरात आरोपीचा शोध घेतला असता त्यांना विशाल हौशीराम खेमनर व सागर गोरक्षनाथ जगताप हे दोघे आढळून आले. पोलीस पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा सोनू मोर (पूर्ण नाव माहित नाही रा. डिग्रस, ता. संगमनेर), तुषार हौशीराम खेमनर (रा. अंभोरे, ता. संगमनेर), लखन मदने (रा. आश्वी, ता. संगमनेर) ताहीर शेख (रा. अंभोरे, ता. संगमनेर) यांच्या मदतीने केला असल्याचे कबूल केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,443
अंभोरे एलसीबी डिग्रस तहसीलदार महसूल पथकावर हल्ला संगमनेर तालुका पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.