Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जाणार – रेल्वे मंत्र्यांचे आमदार खताळ यांना सकारात्मक आश्वासन
राजकारण

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जाणार – रेल्वे मंत्र्यांचे आमदार खताळ यांना सकारात्मक आश्वासन

पुणे-नाशिक रेल्वे मार्ग GMRT (Giant Metrewave Radio Telescope) मुळे अडथळा निर्माण होत असल्याचे वृत्तपत्रातून समोर आले होते. मात्र, या मुद्द्यावर सखोल चर्चा करून योग्य पर्याय काढण्याचा निर्णय रेल्वेमंत्री यांनी घेतला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दिनांक १३ – 

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच ठेवण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली असून, या संदर्भात दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आमदार अमोल खताळ यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथील लोकसभा सचिवालय येथे भेट घेतली.

या भेटीत सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते. रेल्वेमंत्री यांनी संगमनेर मार्गेच हा रेल्वे मार्ग जाईल, असे सकारात्मक आश्वासन दिले.

आमदार खताळ यांनी या भेटीत रेल्वे मंत्र्यांना पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गेच जावा याबाबतचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. या पत्रात त्यांनी या मार्गाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामांचा सविस्तर उल्लेख केला आहे. यावेळी आमदार विठ्ठलराव लंके देखील उपस्थित होते.

संगमनेर हा पुणे-नाशिक दरम्यानचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून, येथून दररोज हजारो प्रवासी पुणे आणि नाशिकला प्रवास करतात. तसेच, हा परिसर कृषी आणि औद्योगिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. संगमनेर तालुका ड्रॅगनफ्रूट, द्राक्षे, डाळिंब, कांदा, भाजीपाला यांसारख्या शेती उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. या रेल्वे प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होईल, तसेच वाहतूक खर्चात मोठी बचत होईल. औद्योगिक दृष्टिकोनातूनही हा मार्ग फायदेशीर असून, संगमनेर आणि आळेफाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. रेल्वे मार्गामुळे उद्योगांना अधिक सुविधा मिळतील, परिणामी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

याशिवाय, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे-नाशिकला जातात. रेल्वेमुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच, पुणे-नाशिक रेल्वे मार्ग GMRT (Giant Metrewave Radio Telescope) मुळे अडथळा निर्माण होत असल्याचे वृत्तपत्रातून समोर आले होते. मात्र, या मुद्द्यावर सखोल चर्चा करून योग्य पर्याय काढण्याचा निर्णय रेल्वेमंत्री यांनी घेतला. संगमनेर, आळेफाटा, आंबेगाव, राजगुरुनगर या मार्गावरूनच रेल्वे जाईल, अशी खात्री त्यांनी दिली.

संगमनेरसह संपूर्ण परिसराच्या विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. “आम्ही सतत पाठपुरावा करत असून, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जाणार याचा आम्हाला विश्वास आहे. या निर्णयामुळे शेतकरी, उद्योगपती, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवासी यांना मोठा फायदा होणार आहे,” असे आमदार अमोल खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,850
अमोल खताळ अश्विनी वैष्णव पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग मुरलीधर मोहोळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar06/09/20260

आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त…

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.