Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

August 2, 2026

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

August 2, 2026

‘गोरी’ क्रीमच संगमनेर कनेक्शन उघड; पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अँटी करप्शन ब्युरोच्या जाचानंतर राजन साळवी यांचा सेनानेते राऊतांवर रोख, म्हणाले राऊतांमुळे निवडणुकीत…
राजकारण

अँटी करप्शन ब्युरोच्या जाचानंतर राजन साळवी यांचा सेनानेते राऊतांवर रोख, म्हणाले राऊतांमुळे निवडणुकीत…

राजन साळवी यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटाला धक्का असल्याचं मानलं जातं.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 13, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईने संकटात सापडलेले शिवसेनेचे कोकणचे कट्टर सैनिक राजन साळवी यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकला. मात्र हे करताना त्यांनी एसीबी कारवाईविषयी ब्र न काढता पक्ष सोडण्याला विनायक राऊत कारणीभूत असल्याचं सांगत आपली कातडी वाचवली आहे. सुमारे चार कोटीच्या बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचं निमित्त करत एसीबीने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवरही कारवाईची टांगती तलवार उगारली होती.

एकीकडे बेहिशेबी मालमत्तेचं प्रकरण डोक्यावर असताना विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच त्यांनी बुधवारी  पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत ठाकरेंची साथ सोडली.

यानंतर आज (१३ फेब्रुवारी) ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करते झाले. या पक्षप्रवेशाआधी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजन साळवी म्हणाले की, गेले ३८ वर्ष मी रत्नागिरीमध्ये जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक आहे. त्यामुळे २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. कारण या निवडणुकीत माझ्या पक्षातील नेत्यांनीच माझ्या विरुद्ध काम केले.

खरं तर विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे. कारण विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं, असा गंभीर आरोप राजन साळवी यांनी केला आहे.

सामंत बंधूंविरोधातील वादावर बोलताना राजन साळवी म्हणाले की, त्यांच्याबरोबर आता माझी समेट झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तिघांना समजवून सांगितलं की, शिवसेना आपल्याला वाढवायची आहे. त्यामुळे आता आमच्यातील वाद मिटले आहेत. माझ्या मतदारसंघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर, मला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, असं मी आधीच बोललो होतो. त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे, असं  साळवी म्हणाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईसंदर्भात बोलताना राजन साळवी म्हणाले, कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही. तेव्हाही मी घाबरलो नाही आणि आताही  घाबरत नाही. चौकशी केली तरी मी सहकार्य करेन. कारण मला खात्री आहे मी निर्दोष आहे.

जेव्हा निवडणूका होत असतात तेव्हा आरोप होत असतात, असेही राजन साळवी म्हणाले.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक करून असलेले उदय सामंत यांना चाप बसवण्यासाठी शिंदे यांना पर्याय हवा होता. तो साळवी यांच्या रूपाने मिळाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु झाली आहे. साळवी यांना पक्षात प्रवेश देत असल्याने कोकणातील सामंत बंधूच्या वर्चस्वालाच धक्का दिला जात असल्याचं उघडपणे बोललं जात आहे.

बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उदय सामंत, किरण सामंत आणि राजन साळवी यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यातील अंतर्गत वाट मिटवून या दोघांमध्ये समेट घडवून आणला. ही बैठक तब्बल दोन तास सुरू होती. या बैठकीनंतर किरण सामंत आणि राजन साळवी हे एकाच गाडीतून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.

राजन साळवी यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटाला धक्का असल्याचं मानलं जातं. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना, कोणी पक्ष सोडल्यामुळे शिवसेनेची (ठाकरे) ताकद कमी होणार नाही. राजन साळवी हे गेल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला फार काही फरक पडणार नाही, असं म्हटलं. 

दानवे यांना राजन साळवी यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, राजन साळवी यांचा पराभव झाला नसता तर ते गेले असते का? निवडणुकीत जय–पराजय होतच असतात. हा जय-पराजय अंतिम नसतो. या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे. आमच्या शिवसेनेने एकाचवेळी ४० आमदार गेलेले पाहिलेत, एक माजी आमदार गेला म्हणून काय मोठा फरक पडणार आहे, असं दानवे म्हणाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 628
अंबादास दानवे एकनाथ शिंदे राजन साळवी विनायक राऊत शिवसेना शिंदे गट प्रवेश
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

२ लाखांच्या बदल्यात ८ लाखांचे आमिष! खेळण्यातील नोटांचा वापर; ४ भामट्यांवर गुन्हा दाखल, ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’च्या नोटांच्या जोरावर नोटा बदलणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  खऱ्या नोटांच्या बदल्यात चौपट बनावट नोटा देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या…

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

August 2, 2026

‘गोरी’ क्रीमच संगमनेर कनेक्शन उघड; पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात

August 2, 2026

संगमनेर शहरात बेकायदेशीर गोमांस वाहतूक उघडकीस; ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी पसार

August 2, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.