Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील पाच लाख रुपयांच्या बहुचर्चित खंडणी प्रकरणातील त्या महिला आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने दिला हा निर्णय
न्यायालय

संगमनेरमधील पाच लाख रुपयांच्या बहुचर्चित खंडणी प्रकरणातील त्या महिला आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने दिला हा निर्णय

जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी आरोपी महिला कृष्णा सारडा हिचा जामीन अर्ज नामंजूर केला. अटकपूर्व जामीनासाठी आरोपीला आता उच्च न्यायालयात जावे लागणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/02/2025Updated:14/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी
बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील महिला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे खंडणी प्रकरणातील आरोपींच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक, संगमनेर) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक, संगमनेर) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी, संगमनेर) अशी खंडणी प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व यामुळे त्यांचे वैवाहिक जिवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखिल तिघा जणांनी त्यांचे जुने साखरपुड्याचे फोटोचा दुरुपयोग करून आरोपींनी फोटो व्हायरल करून त्याबदल्यात या सामाजिक कार्यकर्त्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती.
या घटनेतील फिर्यादी तरुणीचे सामाजिक कार्यकर्त्यांची लग्न ठरले होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी कर्हे घाटात एका छोट्या मंदिरात साखरपुडा देखील केला. मात्र यानंतर या दोघांमध्ये झालेल्या भांडणामुळे फिर्यादी तरुणी आणि हा कार्यकर्ता कधीही एकमेकांशी संपर्कात आले नाही. मात्र या दोघांमधील भांडणावेळी फिर्यादीचा मोबाईल ओंकार राऊत आणि त्याच्या पत्नीने काढून घेतला होता. त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी तरुणी आणि साक्षीदाराचा एकत्रित फोटो सामाजिक माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीच्या नावाचा वापर करत यातील आरोपी महिला कृष्णा सारडा हिने साक्षीदार सामाजिक कार्यकर्त्याने फसवून फिर्यादी तरुणीशी लग्न केले असून लग्नाचे फोटो माझ्याकडे आहे. या संदर्भातील बातमी न्यूज चॅनेलवर द्यायची नसेल तर सामाजिक कार्यकर्त्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा झाली होती.
पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याने संतापलेल्या तरुणीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सदर विवाहित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ओंकार मारूती राऊत रा. घुलेवाडी, गोविंद राम नागरे रा. नेहरू चौक व कृष्णा अजित सारडा रा. अशोक चौक, संगमनेर या तिघांविरुद्ध गु.र.नं. ४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२), ३०८ (२), ३०८(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
दरम्यान यातील आरोपी कृष्णा सारडा हिने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान सरकार पक्षाचे सहाय्यक सरकारी वकील प्रमोद वाघ यांनी या मागील सर्व घटनाक्रम न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सखोल तपासासाठी आरोपीच्या कस्टडीची आवश्यकता असल्याची मागणी केली होती. आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी संगणमत करून पुण्यातील फिर्यादी व साक्षीदाराचे साखरपुड्याचे फोटो अर्जदार आरोपी क्रमांक तीन हिला दिला होता. सदर फोटो प्रसारित करण्यास सांगितल्याचे भाषण आरोपीने या सामाजिक कार्यकर्त्याकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली असल्याचे तसेच दहा हजार रुपयांची खंडणी दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. आरोपी पोलिसांना सहकार्य करत नाही. याशिवाय अन्य महत्त्वाच्या बाबीही सरकारी वकील वाघ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
सहाय्यक सरकारी वकील वाघ आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी आरोपी महिला कृष्णा सारडा हिचा जामीन अर्ज नामंजूर केला. अटकपूर्व जामीनासाठी आरोपीला आता उच्च न्यायालयात जावे लागणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,515
अटकपूर्व जामीन अर्ज खंडणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026

सायखिंडी फाटा गांजा तस्करीत आरोपींना पुन्हा १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी; बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.