Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्थेतील ८१ कोटीच्या अपहारप्रकरणी अटकेत असलेल्या भाऊसाहेब कुटेला उच्च न्यायालयाचा दिलासा नाही
न्यायालय

दूधगंगा पतसंस्थेतील ८१ कोटीच्या अपहारप्रकरणी अटकेत असलेल्या भाऊसाहेब कुटेला उच्च न्यायालयाचा दिलासा नाही

सरकार पक्षाच्या वतीने तसेच ठेवीदार प्रभाकर राहणे, चंद्रभान लांडगे, नलिनी लांडगे, संभाजी देशमुख, विवेक सोनवणे या ठेवीदारांच्या वतीनेदेखील आरोपीला जामीन देण्यास जोरदार विरोध करण्यात आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

छत्रपती संभाजीनगर – 

संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी तब्बल आठ-नऊ महिन्यापासून अटकेत असलेल्या मुख्य सूत्रधार संस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज नाकारल्याने कुटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कुटे याचा नियमित जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने नाकारल्यानंतर त्याने जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र औरंगाबाद खंडपीठानेही कुटेला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दूधगंगा पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याचा तुरुंगातील मुक्काम जैसे थे राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाचे ठेवीदारांनी स्वागत केले आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा आर्थिक घोटाळा समोर आला लेखा परीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुमारे ८१ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याच्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींत पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड, चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज (छत्रपती संभाजीनगर), दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, अमोल कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर सोनाली दादासाहेब कुटे, अमोल ट्रेडिंग कंपनी प्रोप्रायटर दादासाहेब भाऊसाहेब कुटे, श्री डेव्हलपर्स संदीप भाऊसाहेब कुटे (सर्व संगमनेर), यांच्यासह कृष्णराव श्रीपतराव कदम, श्रीमती प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम (सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) व संदीप दगडू जरे (रा. अहमदनगर) यांच्यासह त्यांना सहाय्य करणाऱ्या तत्कालीन लेखापरीक्षकांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

बँकेच्या व्यवस्थापकासह काही आरोपींना गुन्ह्याचा तपास करणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अटक केली होती. त्यानंतर आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने हा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. दरम्यानच्या काळात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बहुतांश आरोपींचे जामीन अर्जदेखील फेटाळून लावले होते.

मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्या कुटुंबीयांना थेट सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भाऊसाहेब कुटे पोलिसात हजर झाल्यापासून अद्याप पर्यंत तुरुंगात आहे. आपला या गुन्ह्यात संबंध नसून आपली जामीनावर मुक्तता करण्यात यावी, यासाठी आरोपीने संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटे याला जामीन देण्यास सहाय्यक सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते, ठेवीदारांच्यावतीने काम बघणाऱ्या ॲड. सीमा काळे-सातपुते यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश योगेश मनाठकर आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

त्यानंतर आरोपी कुटे याने खंडपीठात धाव घेतली होती. आरोपीच्यावतीने शेख मजहर हे जहागीरदार यांनी काम बघितले. आरोपी आजारपणामुळे त्रस्त असून या गुन्ह्याचे आरोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे. आरोपीकडून कोणतीही रिकव्हरी बाकी नसून आरोपीची सुमारे ५० कोटी रुपयांची मालमत्ता देखील तपास अधिकाऱ्यांनी रेकॉर्डवर घेतली आहे. या गुन्ह्याचा तपास देखील पूर्ण झाला असल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाने सांगितले.

सरकार पक्षाच्या वतीने ॲड. एस. बी. नरवडे, तसेच ठेवीदार प्रभाकर राहणे, चंद्रभान लांडगे, नलिनी लांडगे, संभाजी देशमुख, विवेक सोनवणे या ठेवीदारांच्या वतीने अँड. योगेश काळे यांनीदेखील आरोपीला जामीन देण्यास जोरदार विरोध करण्यात आला. सर्वांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अभय वाघवासे यांनी बुधवारी आरोपीला जामिनावर मुक्त करण्यास नकार देत अर्ज फेटाळून लावला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 5,200
औरंगाबाद खंडपीठ दूधगंगा पतसंस्था भाऊसाहेब कुटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त, तरी आरोपीला जामीन! संगमनेर न्यायालयाच्या आदेशात नेमके काय?

09/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.