Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ह्या लोकांनी पैशाचा बाजार मांडलाय… धमक्या आणि ब्लॅकमेलिंग करून आमदारांची फोडाफोडी – अंबादास दानवे
राजकारण

ह्या लोकांनी पैशाचा बाजार मांडलाय… धमक्या आणि ब्लॅकमेलिंग करून आमदारांची फोडाफोडी – अंबादास दानवे

शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा देवून सरकार उपकार करत नाही. याच शेतकऱ्यांच्या बळावर त्यांचे राज्य चालले आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या अनेक अनुदान योजना थांबवल्या आहेत, असाही आरोप दानवे यांनी केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/02/2025Updated:15/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी / मुंबई

शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारीच नाही तर बडे नेतेही ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहेत. कोकणातील उद्धव ठाकरेंचे निष्ठावान माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर मराठवाड्यातील नांदेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसैनिक उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून का जात आहे, याचे उत्तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.

दानवे यांनी कोणाचे नाव न घेता म्हटले की, समोरचे लोक बाजार मांडून बसले आहेत. पैशांची ऑफर देत आहेत. विकास कामांची ऑफर दिली जात आहे. सर्रास खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात आहे. या सगळ्या लोकांनी बाजार मांडला आहे. जे बाजारात मांडलेले आहेत ते लोक जात आहेत. त्याचे आम्हाला दुःख नाही. फक्त खरेदी-विक्री होत नाही, तर ब्लॅकमेलिंग देखील केले जात आहे. असाही आरोप अंबादास दानवे यांनी केला.

ऑपरेशन टायगर थांबणार नाही, एक खासदारही आमच्या संपर्कात असल्याचे शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. त्यासंबंधी बीड जिल्ह्यातील परळी येथील आमदार धनंजय मुंडेंवर विरोधी पक्षांकडून आणि सत्ताधारी महायुतीच्या काही नेत्यांकडूनही वारंवार हल्ला होतोय. दानवे म्हणाले की, योगेश कदम यांना अजून काही माहित नाही. त्यांना शिवसेना संघटना काय आहे हेही माहीत नाही. बापाच्या बळावर आमदार होणं सोपं असतं. पण संघटना उभी करणं अवघड आहे. फक्त घोषणा करणे, वल्गना करणारे खूप आले आणि गेले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना तळपत्या तलवारीसारखी येत्या काळात तळपताना दिसेल, असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.

फडणवीसांच्या सपत्नीक कुंभ स्नानावरुन दानवेंनी घेतला चिमटा… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराज येथे पोहोचले आहेत. ते कुंभमेळ्यात जाणार आहेत. यावरुन विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री कुंभमेळ्याला जाणार याचा अर्थ त्यांनी बरीच पापं केलेली आहेत. केलेलं पाप धुण्यासाठी ते चालले असतील. त्यांच्या कुंभमेळा दौऱ्यावर काय बोलायचे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते की, हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला. कृषीमंत्री कोकाटे यांच्या या वाक्याचा दानवे यांनी समाचार घेतला. दानवे म्हणाले, कृषीमंत्री शेतकऱ्यांना भिकाऱ्यांची उपमा देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणतो त्यांच्याबद्दल अशी भाषा शोभणारी नाही. शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा देवून सरकार उपकार करत नाही. याच शेतकऱ्यांच्या बळावर त्यांचे राज्य चालले आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या अनेक अनुदान योजना थांबवल्या आहेत, असाही आरोप दानवे यांनी केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 370
अंबादास दानवे महायुती सरकार माणिकराव कोकाटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्याच्या विकासाला अखेर मोठा वेग…

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.