अहिल्यानगर, दि. १८ फेब्रुवारी –
खांबावर जाहिरात फलक लावल्याप्रकरणी संगमनेरमधील अकॅडमी चालकाविरुद्ध अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील जाहिरात फलकांचा (फ्लेक्स) विषय चर्चेत आला आहे.
अहिल्यानगर पुणे रस्त्यावर उड्डाणपुलाच्या खांबाला जाहिरातीचा फलक लावल्याप्रकरणी संगमनेर येथील आर्य अकॅडमी चे सुनील खंडेराव फटांगरे (रा. सायखिंडी, ता. संगमनेर) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरणास प्रतिबंध अधिनियम २९९६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अहिल्यानगर महापालिकेचे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शनिवारी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी अहिल्यानगर पुणे रस्त्यावरील उड्डाणपुलाखालील रस्त्यावर स्वच्छता करत होते. यावेळी उड्डाणपुलाच्या माळीवाडा बस स्थानकासमोरील खांबाला आर्य अकॅडमीच्या जाहिरातीचा फलक लावला असल्याचे निदर्शनास आले.
अधिकारी कर्मचाऱ्यांनी या संदर्भात अधिक माहिती घेतली असता सदरचा जाहिरात फलक हा संगमनेर येथील सुनील फटांगरे यांच्या आर्य अकॅडमीचा असल्याचे समोर आले होते.

उड्डाणपुलाच्या खांबाला जाहिरात फलक… संगमनेरच्या अकॅडमीच्या मालकाविरुद्ध अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
अधिकारी कर्मचाऱ्यांनी या संदर्भात अधिक माहिती घेतली असता सदरचा जाहिरात फलक हा संगमनेर येथील सुनील फटांगरे यांच्या आर्य अकॅडमीचा असल्याचे समोर आले होते.

