Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेवटचे क्रियाकर्म करण्यासाठी शांती घाट, प्रवरा संगमावर जाण्यासाठी ओलांडावी लागते गटारगंगा… नगरपरिषदेने लक्ष घालण्याची आवश्यकता
पत्रकारिता

शेवटचे क्रियाकर्म करण्यासाठी शांती घाट, प्रवरा संगमावर जाण्यासाठी ओलांडावी लागते गटारगंगा… नगरपरिषदेने लक्ष घालण्याची आवश्यकता

सध्या नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्याने मुख्याधिकारी तथा प्रशासक असलेले रामदास कोकरे या संदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. २० फेब्रुवारी – अनंत पांगारकर

मृत्यूनंतर माणसाचा शेवटचा प्रवास किमान सुखकर व्हावा अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. मात्र मृत्यूनंतर त्याचे क्रिया कर्म करण्यासाठी जाणाऱ्यांना देखील मोठी कसरत करावे लागत असल्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. परिसरातील नागरिकांना दशक्रिया विधीसाठी प्रवरा संगमावर असलेल्या शांती घाटावर जाण्यासाठी गटारगंगा ओलांडून जावे लागत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर संगमनेर नगर परिषदेने दशक्रिया विधीसाठी शांती घाट बांधला आहे. शहरालगतच्या सुकेवाडी, पावबाकी, पोखरी हवेली, खांजापूर, समनापुर आदी ग्रामीण भागातून येथे नागरिक मोठ्या प्रमाणात दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी येत असतात.

नगरपरिषदेने बांधलेल्या शांती घाटावर दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही. शांती घाटावर छतही नसल्याने उन्हातच सर्व विधी उरकावे लागत आहे. तसेच या परिसरात सावलीची कोणतीही व्यवस्था नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे या संगमावर किंवा शांती घाटाकडे जाण्यासाठी योग्य रस्ता देखील उपलब्ध नसल्याने नागरिकांना गटारीच्या पाण्यातून जावे लागते. शहरातील सांडपाणी या गटारीच्या माध्यमातून म्हाळुंगी नदीपात्रात व तेथून प्रवरा नदीपात्रात जाते.

शहराच्या या गटारगंगेतून जाताना नागरिक नगर परिषदेचा सातत्याने उद्धार करताना दिसतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून प्रचंड ऊन असल्याने सकाळच्या वेळी देखील नागरिकांना येथे बसणे असह्य होते. दशक्रिया विधीसाठी आलेल्या पुरुष आणि महिलांना ओले कपडे बदलण्यासाठी देखील येथे कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच नदीला पाणी नसल्यानंतर या ठिकाणी पाण्याची कोणतीही व्यवस्था नसते. 

पाण्याच्या व्यवस्थेसाठी नगरपरिषदेने या ठिकाणी एखादा बोअर मारून पाण्याची उपलब्धता करून देण्याची गरज आहे. तसेच सावलीसाठी छत बांधण्याची आवश्यकता असून ज्या गटारगंगेतून नागरिकांना चालत जावे लागते ते गटारीचे पाणी देखील इतरत्र वळविण्याची आवश्यकता आहे.

सध्या नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्याने मुख्याधिकारी तथा प्रशासक असलेले रामदास कोकरे या संदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 824
प्रवरा संगम शांती घाट समस्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

05/08/2026

संगमनेरमध्ये रेशनच्या धान्याचा काळा बाजार? पोलीस अन् पुरवठा विभागाच्या संशयास्पद भूमिकेने संभ्रम!

05/08/2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

19/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.