Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृती समित्यांच्या आक्रमकतेनंतर सत्ताधारी नरमले, जनतेच्या दबावानंतर संगमनेर तालुक्यातील महसूल मंडळाची होणार फेररचना
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व कृती समित्यांच्या आक्रमकतेनंतर सत्ताधारी नरमले, जनतेच्या दबावानंतर संगमनेर तालुक्यातील महसूल मंडळाची होणार फेररचना

प्रशासकीय पातळीवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आमदार सत्यजित तांबे ही मंत्रालयात महसूल मंत्री यांची भेट घेतली. कृती समितीने न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा दिला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी माघार घेत आता महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय आश्वी येथे अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव होणार नाही असे सांगितलं आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/02/2025Updated:21/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २० फेब्रुवारी – 

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर महसूल प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेता परस्पर आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविल्यानंतर नव्याने होऊ घातलेल्या अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गावावरून संगमनेर तालुक्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान याप्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कृती समित्यांच्या आक्रमकतेनंतर सत्ताधारी नरमले असून तालुक्यातील महसूल मंडळाचे जनतेच्या दबावानंतर फेररचना होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही परिस्थितीत संगमनेर तालुक्याचे मोडतोड होऊ दिली जाणार नसल्याचा इशारा प्रशासनारा दिला होता. तर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील यासाठी मंत्रालयात पाठपुरावा केला. नव्या तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांनी या प्रस्तावाला विरोध दाखवत आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला.

आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या फेररचनेमध्ये संगमनेर शहराजवळील अनेक गावे जोडली आहेत. समनापुर व संगमनेर खुर्द महसूल मंडळ त्यामध्ये समाविष्ट केले आहेत. यामुळे ६२ गावांमधील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी संगमनेर तालुका मोडण्याचा कुटील डाव आखला होता, मात्र लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक इशारा दिला. याचबरोबर जनता ही रस्त्यावर उतरली. कृती समितीने आंदोलन केले. तालुका बचाव कृती समिती आणि तालुक्यातील ६२ गावांमधील जनता या निर्णयाविरोधात एकवटली.

वेळोवेळी निदर्शने केली निवेदन दिली आणि उपोषण व आत्मदहनाचा इशाराही दिला. याचबरोबर प्रशासकीय पातळीवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आमदार सत्यजित तांबे ही मंत्रालयात महसूल मंत्री यांची भेट घेतली. कृती समितीने न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा दिला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी माघार घेत आता महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय आश्वी येथे अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव होणार नाही असे सांगितलं आहे.

संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक परिवार म्हणून आहे हा तालुका एकवटला असून आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयास संगमनेर तालुक्यातील जनतेने आणि नागरिकांनी कडाडून विरोध केला असल्याचे माजी मंत्री थोरात यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,707
आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालय बाळासाहेब थोरात महसूल मंडळ पुनर्रचना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.