Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » काँग्रेसला गळती… एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर तर जिल्हाध्यक्ष राहिलेल्या किरण काळेंचा दुपारी ठाकरे गटात प्रवेश
राजकारण

काँग्रेसला गळती… एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर तर जिल्हाध्यक्ष राहिलेल्या किरण काळेंचा दुपारी ठाकरे गटात प्रवेश

येत्या दोन दिवसात माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/02/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २३ फेब्रुवारी – 

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसचे राज्यातील मातब्बर नेते म्हणून बघितले जाते. अनेक जण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव झाल्याने आता काँग्रेसला गळती लागल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले अहिल्यानगरचे किरण काळे आज रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे. तर पुण्याचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे देखील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून त्याच्या दोन दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ते निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विचारांशी बांधिलकी सांगणारे आहे. 

नाशिक पदवीधर मतदार संघातून अपक्ष निवडून आलेले सत्यजित तांबे यांच्या बद्दल देखील सातत्याने महायुतीतील पक्षप्रवेशाच्या अफवा सातत्याने महायुतीच्या गटातून उठविल्या जाताना दिसत असताना पक्ष देखील तांबे यांचे निलंबन मागे घेण्यास अद्याप तयार नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय याचा देखील अंदाज येत नाही.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून झालेला पराभव हा संगमनेरकरांसाठीच नव्हे तर राज्याच्या राजकीय क्षेत्रात आणि काँग्रेससाठी धक्कादायक मानला जातो. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर आघाडीतील नेत्यांमध्ये, पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. महायुतीला मिळालेले मोठे यश बघता राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता देखील नसल्याने अनेकांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना रामराम करण्याचा निर्णय घेतल्याचे वारंवार समोर येत आहे.

काँग्रेसचे अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष किरण काळे रविवारी दुपारी बारा वाजता मातोश्रीवर शिवबंधन बांधत असल्याची माहिती पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवर दिली आहे. काही दिवसांपूर्वीच काळे यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने आहिल्या नगर जिल्ह्यात ठाकरे गटाला चांगला आणि आक्रमक नेता मिळणार आहे.

तर दुसरीकडे कसबा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍सवर एक फोटो ठेवला, त्यामध्ये गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं आहे. राजा हरला काय, राजा जिंकला काय, राजा हा राजा असतो, निष्ठेत तडजोड नाही! आशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत याच याच धंगेकर यांच्या विजयासाठी बाळासाहेब थोरात यांच्यासह संगमनेरमधील अनेक धंगेकर समर्थक थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात प्रचारासाठी मोठा वेळ दिला होता. 

मात्र त्यांच्या देखील शिवसेना प्रवेशाच्या चर्चा रंगल्या असून मंत्री उदय सामंत यांच्याकडून या संदर्भात भाष्य करण्यात आले होते. चारच दिवसांपूर्वी सामंत यांची रविंद्र धंगेकर भेट घेतली होती. त्या भेटीचे फोटो उदय सामंत यांनी ट्विट केले होते. त्यामुळे मिशन टायगर अंतर्गत रविंद्र धंगेकर यांचा शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली.

मात्र पक्ष प्रवेशासंदर्भात धंगेकर म्हणाले, सोशल मीडियात माझा जो फोटो व्हायरल होत आहे. तो शिवजयंतीमधील आहे. तो चांगला वाटला म्हणून स्टेटसला ठेवला, त्यामध्ये काहीही गैर नाही. तसेच मी काँग्रेसमध्येच आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान असून द्वेष करण आपल्याला जमत नाही. पण मागील काही दिवसात राजकीय वर्तुळात जे काही सुरू आहे. त्याबाबत मी येत्या दोन दिवसात माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्याही पक्ष बदलण्याच्या चर्चेने वेग घेतला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,385
किरण काळे पक्षप्रवेश रवींद्र धंगेकर शिवसेना ठाकरे शिवसेना शिंदे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.