Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सत्ताधाऱ्यांनी टोकाचे धर्माचे राजकारण केले… लोकशाही वाचविण्यासाठी तुम्हीही आता हर हर महादेव म्हणत मैदानात उतरा – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सल्ला
Uncategorized

सत्ताधाऱ्यांनी टोकाचे धर्माचे राजकारण केले… लोकशाही वाचविण्यासाठी तुम्हीही आता हर हर महादेव म्हणत मैदानात उतरा – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सल्ला

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले मात्र अवघ्या चारच महिन्यात इतका बदल कसा होऊ शकतो हा मोठा प्रश्न आहे. ईव्हीएम बाबतही संपूर्ण देशात मोठी शंका आहे. याबाबत निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देऊ शकलेलं नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/02/2025Updated:26/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २६ फेब्रुवारी 

राजकारण हे नेहमी समाजाच्या हिताचे असायला हवे मात्र, धर्माचा आधार घेत सत्ताधाऱ्यांनी टोकाचे राजकारण केले आहे. समाज माध्यमांचा चुकीचा वापर करत यश मिळविले असले तरी जनतेच्या प्रश्नासंदर्भात काँग्रेस पुन्हा मैदानात उतरलेली आहे. लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस आणि लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाने आता “हर हर महादेव” म्हणत पुन्हा मैदानात उतरावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

संगमनेरमध्ये मंगळवारी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची सहविचार बैठक जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी थोरात बोलत होते.

ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, प्रभावती घोगरे, मधुकरराव नवले, डॉ. जयश्री थोरात, संपतराव म्हस्के, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्ञानदेव वाफारे, हिरालाल पगडाल, प्रतापराव शेळके, अमृत गायके, सचिन चौगुले, शिवाजी नेहे, अरुण गावित्रे, बाबासाहेब दिघे, पंकज लोंढे, बाळासाहेब नाईकवाडी आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. मात्र त्यानंतर राज्यात सत्ताधाऱ्यांनी धर्माचे अत्यंत टोकाचे राजकारण केले. समाज माध्यमातून अनेक खोट्या गोष्टी पसरवल्या त्यामुळे पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. लोकशाहीमध्ये जय-पराजय होत असतात. राजकारण केवळ सत्तेसाठी नव्हे तर समाज हितासाठी केले पाहिजे.

येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध निवडणुका पार पाडणार आहे. या निवडणुकांना नव्या उमेदीने सर्वांना सोबत घेऊन सामोरे जायचे आहे. शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काम करायला हवे. काँग्रेस पक्षाला विचारांची, त्यागाची आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले मात्र अवघ्या चारच महिन्यात इतका बदल कसा होऊ शकतो हा मोठा प्रश्न आहे. ईव्हीएम बाबतही संपूर्ण देशात मोठी शंका आहे. याबाबत निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देऊ शकलेलं नाही.

कोण काय म्हणाले…

प्रभावती घोगरे म्हणाल्या, विधानसभेमध्ये सत्तेच्या गैरवापरातून महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय खोटा आहे.

घनश्याम शेलार म्हणाले, बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्हाध्यक्ष जयंत वाघ म्हणाले, काँग्रेसचे मोठी परंपरा असून अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसचा विचारांचा राहिला आहे. यापुढील काळातही थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी अधिक जोमाने काम करावे.

याप्रसंगी मधुकरराव नवले, हिरालाल पगडाल, सचिन गुजर, लता डांगे, बनसोडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,213
काँग्रेस बैठक जयंत वाघ बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

By Annant Ppangarkar29/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर:  स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास…

एलसीबीची छापेमारी, २.९९ लाखांचा मुद्देमाल जप्त करत १४ आरोपींवर गुन्हा दाखल

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026

आज शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

29/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.